तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी) : आई तुळजाभवानी माता साडेतीन पीठापैकी एक पुर्ण शक्तीपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आई राजा उदो उदो च्या जयघोषात घटस्थापना करण्यात येऊन गुरुवारी (दि.७) आई तुळजाईचा मंचकी निद्राकाल संपन्न होऊन देविचा सिंहगावाबारा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. गुरुवारी पहाटे श्री तुळजाभवानीच्यामूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळच्या नित्योपचार अभिषेक पूजेनंतर दुपारी १२ वा. देविच्या सिंह गाभार्यात घटस्थापना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे,धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुल,महंत तुकोजबुवा, महंत हमरोजीबुवा, सर्व पुजारी बांधव आदी उपस्थित होते. घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्स प्रारंभ झाला.
७ आक्टोंबर ते २१ आक्टोंबरपर्यंत मोठ्या उत्साहात पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तूभ दिवेगावकर व त्यांच्यासह पाळीचा मुख्य भोपे पुजारी सुरेश साहेबराव कदम परमेश्वर यांच्या हस्ते तसेच आ.राणाजगजितसिंह पाटील, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तहसिलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील, मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंदीरसह व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले, जयसिंग पाटील, सेवेदारी महंत हमरोजीबुवा, तुकोजीबुवा सुधीर कदम, संजय परमेश्वर, सचिन कदम, समाधान कदम, विनोद सोंजी, अतुल मलबा, संजय सोंजी, प्रशांत सोंजी, सचिन पाटील, जगदीश पाटील, सुहास भैय्ये, विनोद सोंजी, आण्णासाहेब सोंजी, गणेश परमेश्वर, पाळकर मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके,बापू रोचकरी, धनंजय लोंढे, नागेश साळुंके, अविनाश गंगणे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,सर्वोत्तम जेवळीकर,बंडोपंत पाठकसह अनेक मंदीर कर्मचारी पोलीस प्रशासन उपस्थित होते.
हा शारदीय नवरात्र महोत्सव या महिन्यात भाविकांची संख्या मोठ्या संख्येणे असते त्यामुळे या पुजारीवृदं देवीजीस सिंहासन महाअभिषेक पुजा करतात मात्र या वर्षी कोरोना महामारी मुळे कुल कुलाचार मंदिरात नकरता मंदिराच्या बाहेर करावा असा मंदिर संस्थानने आव्हाण केले आहे . तसेच शारदीय नवरात्रउत्सव सहा दिवस उपवास करतात या शारदीय नवरात्र उत्सव काळात सर्व धार्मिक विधी महापूजा भाविकांसठी बंद आहेत दहा हजार व पेड दर्शन पाच हजार असे मिळुन १५ हजार भाविकांना फक्त दर्शन करून मंदिराच्या बाहेर काढतात भाविकांनी मंदिराच्या बाहेर असे मंदिर संस्थान व पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे.