24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeउस्मानाबादएकमतच्या दणक्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग

एकमतच्या दणक्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : हायब्रीड अ‍ॅन्युईटी प्रकल्पाअंतर्गत कळंब-लातूर रस्त्याचे कामासाठी रांजणी (ता. कळंब) येथे बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या दगड खदाण, स्टोन क्रशर व डांबर प्लँन्टची पाहणी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी दासरेवाड यांनी मंगळवार दि. ३० रोजी प्रत्यक्ष साईटवर जाऊन केली आहे. क्षेत्रीय अधिकारी उद्या पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून त्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या विरोधात काय कारवाई प्रस्तावित होते हे समजणार आहे.

हायब्रीड अ‍ॅन्युईटी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात कळंब-लातर व उस्मानाबाद-बेंबळी-उजनी रस्त्याचे ७२२ कोटी खर्चाचे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. कळंब-लातूर रस्त्याचे काम मुळ ठेकेदाराने ऐश्वर्या कंस्ट्रक्शन या सब ठेकेदार कंपनीला दिले असून हे काम करण्यासाठी रांजणी (ता. कळंब) गावाजवळ दगड खदाण, स्टोन क्रशर, डांबर प्लॅन्ट उभारला आहे. हॉ प्लॅन्ट उभा करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या आवश्यक असणा-या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत.

प्लॅन्टजवळ पाण्याची टाकी व शाळा असताना प्लॅन्टला संबंधित विभागांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दगड खदाणीमध्ये दगड काढण्यासाठी ब्लास्टींग केले जाते. त्यावेळी निघालेले दगड शाळेच्या प्रांगणात, पत्र्यावर पडत आहेत. पाण्याची टाकी कोसळण्याची भिती आहे. ब्लास्टींग करताना उडालेले दगड शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांच्या डोक्यात लागून जीवीतास धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात दैनिक एकमतने वृत्तमालिका सुरु करून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एकमतच्या वृत्तमालिकेची दखल घेऊन प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व्यंकट शेळके यांनी रांजणी येथे बेकायदेशीरपणे उभारलेल्या स्टोन क्रशर, दगड खदाण, डांबर प्लॅन्टची पाहणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी एन. पी. दासरेवाड यांना मंगळवारी पाठविण्यात आले होते. दासरेवाड हे उद्या पाहणी अहवाल कार्यालयात सादर करणार आहेत. (क्रमशः)

Read More  कंस्ट्रक्शन कंपनीला तहसीलदार व प्रदूषण मंडळाचा वरदहस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या