17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home उस्मानाबाद हातातोडांशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा गहिवरला

हातातोडांशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा गहिवरला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून नदी, नाले, ओढे तुडूंब भरले आहेत. पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर शेतक-यांनी पाहिलेली स्वप्न देखील बेचीराख झाले आहे. हाडाची काढं अन रक्ताचं पाणी करुन तळहाताच्या फोडाप्रमाने जपलेली पिकं डोळ्यादेखत सडताना शेतक-यांच्या डोळ्यात अश्रुंचा महापुर वाहतांना दिसत आहे.

तुळजापूर तालुक्यातील वानेगाव येथील नागनाथ गोविंदराव पाटील या अल्पभूधारक शेतक-याने पाहुण्यारावळ्यांकडून हातऊसने पैसे घेऊन दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीपासूनच पिकाचे उत्तम नियोजन केल्यामुळे या पिकातुन आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल असे स्वप्न या शेतकर्याने पाहिले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतकर्याचे स्वप्न एका रात्रीत बेचिराख झाले. कर्ज काढून चार महिने पोटच्या पोरावानी जोपासलेले पिक एकाच क्षणात नाहीसे झाले. आठवडा भरात काढणीला आलेला कांदा पावसामुळे जागेवरच सडल्यामुळे शेतकर्याच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

आठवडाभरापुर्वी रसरसुन फुलंलेल शेत आता पाण्याने ओलेqचब झाले आहे. सडणार्या कांद्याच्या दर्प वासाने बळीराजाचा जीव मेटाकुटीला आलाय. सुरुवातीपासूनच मृगनक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी बांधवानी पेरणीची लगबग केली परंतु पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकरी राजावर दुबार पेरणीचे संकटं उभे राहिले. बियाणे नुकसानभरपाई काही मिळाली नाही पण जगाचा पोqशदा उसनवारी, कर्जे काढून पुन्हा जोमाने पेरणी केली. निसर्गानेही चांगली साथ दिल्याने सोयाबीन, उडीद, कांदे व इतर पिके जोमाने येणार या आशेने संबंध शेतकरीराजा खुश झाला होता. सोयाबीन,उडीद,व इतर पिके काढणीसाठी तयार झाली असतानाच दि.१४ रोजी निसर्गाने रौद्ररुप धारण केले.

सलग दीड दिवस कोसळणार्या मुसळधार पावसाने होण्याचे नव्हते केले. कर्ज काढून चार महिने पोटच्या पोरावानी जोपासलेले पिक एकाच क्षणात नाहीसे झाले.या मुसळधार पावसाने अनेकांनी काढुन ठेवलेले सोयाबीन ताडपत्री सहीत वाहुन गेले तर नुकतेच काढणीच्या अवस्थेत आलेले कांदेही वाहुन गेले. अनेक शेतकरी बांधवाचे वर्षेभर जोपासलेले ऊसाचे पिक आडवे झाले, काहींचे पत्र्याचे शेड, जनावरांचा चारा (कडबा) वाहुन गेला, घरांनी पाणी घुसले, काहींच्या घरांची पडझड झाली तर या पावसाने अनेकांच्या जमीनीतील काळी माती धुवून जाऊन फक्त मुरूम शिल्लक राहीला. आतापर्यंत केलेले सर्वच एका क्षणात पाण्यात गेल्याने शेतकर्यांचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीमुळे बळीराज पुरता कोलमडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीसह प्रशासन, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते विनाकारण दौरे करत शिवारा-शिवारात भटकत आहेत. किती नुकसान झाले याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळतेच. मात्र, भविष्यातील मताच्या राजकारणासाठी पुढार्यांच्या गाडीचे ताफे राळ उडवित फिरू लागले आहेत.

कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती.त्यामुळे बहुतांश शेतकèयांनी कांदा लागवडीला पसंदी दिली. सुरुवातीला तीन ते चार हजार रुपये किलोप्रमाणे शेतकरी बांधवानी बियाण्याची खरेदी केली. मात्र, ऐन लागवडीच्या वेळेला पाऊस घोळ घालत असल्यामुळे ते रोपही नासून वाया गेले. धनदांडग्या शेतकèयांनी इतर शेतकèयांची रोपं विकत घेऊन कांद्याची लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या पुढे त्यांची चलाखी फार काळ टिकली नाही. सध्या पावसामुळे सगळीकडचे कांदे वाहून गेले आहेत. त्यामुळे कांदयाला उच्चांकी भाव मिळण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी रब्बी कांदा लागवडी कडे वळत आहेत. मात्र, बाजारपेठेत कांद्याचे बीयाने शॉर्टेज झाल्यामुळे पुन्हा बियाण्याचे दर गगनाला भिडले आहेत.

लाखो रुपयांचा खर्च पाण्यात
शेतक-यांच्या पाठीमागचे संकटे काही केल्या जात नाहीत. मी खुप अडचणीतुन लाखो रुपये खर्चून कांदा लागवड केली होती. तो खर्च पाण्यात गेला शासनाने ठोस मदत द्यावी अशी मागणी वानेगाव येथील शेतकरी नागनाथ पाटील यांनी केली आहे.

सॅमसंगच्या चेअरमनचा हृदयविकाराने मृत्यू

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...