26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादउद्यापासून उस्मानाबाद, उमरगा शहरात दुचाकी वाहन वाहतुकीस प्रतिबंध

उद्यापासून उस्मानाबाद, उमरगा शहरात दुचाकी वाहन वाहतुकीस प्रतिबंध

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्येही कोविड-१९ च्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार दुचाकी वाहनांवर फक्त एक व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी असून अनेक दुचाकीस्वारांकडून या नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांचेविरुद्ध पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

यानंतरही नगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक दुचाकीस्वारांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये व उमरगा नगर पालिका क्षेत्रामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दुचाकींच्या वाहतूकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पुढील आदेशापर्यंत दुचाकीच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य दुचाकींच्या वाहतुकीस मनाई केली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात जाणे-येणेसाठी ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना व कोविड-१९ चे प्रतिबंधाचे अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, व्यक्तींना ओळखपत्राआधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील. फिरते दूध विक्रेत्यांना दूध विक्रीसाठी दुचाकीचा वापर करण्यास परवानगी राहील.

तातडीच्या वैद्यकीय निकडीकरिता दुचाकीचा वापर करण्यास परवानगी राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी १ ऑगस्ट पासून लागू होणार आहे.

Read More  संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या