30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच आम आदमी पार्टीने आपला उमेदवार रिंगणात उभा केला आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. प्रचाराच्या तोफा सुरु झाल्या आहेत. गावोगाव प्रचारार्थ बॅनर झळकू लागले आहेत. याच बॅनरवर माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांना स्थान न दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यात मोठी नाराजी पसरली आहे. त्यातून आ. सतीश चव्हाण यांना बसवराज पाटील यांची अ‍ॅलर्जी आहे, का? असा सवाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची युती आहे. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात या तीनही पक्षाकडून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यासाठी गावोगाव प्रचारार्थ डिजीटल बॅनर लावले आहेत. यात तीनही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यासह त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी झळकू लागले आहेत. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातही प्रचारार्थ गावोगावी डिजीटल फलक झळकलेले आहेत. पण त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना या बॅनरवरून वगळल्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ही परिस्थिती दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात माजी मंत्री बसराज पाटील याचे गावोगाव कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र या बॅनरवर बसवराज पाटील हे कोठेच दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यकर्ते पदवीधर मतदारात सभ्रम निर्माण झाला आहे. बसवराज पाटील हे औरंगाबाद विभागाचे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असून यापूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री मागच्या वेळेस विधिमंडळ मुख्यप्रतोद म्हणून मागिल वर्षी दोनवेळा निवड झाली. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाचे पहिल्या फळीतील नेते म्हणून बसवराज पाटील यांना पाहिले जाते. उमरगा तालुक्यात सर्वाधिक पदवीधर मतदान आहे. तसेच जिल्हात सर्वात जास्त मानणारा वर्ग आहे. त्यांचा फोटो या प्रचारार्थ लावलेल्या बॅनरवरुन वगळल्याने ग्रामीण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आ. सतीश चव्हाण यांना माजी मंत्री बसवराज पाटील यांची अलर्जी आहे का? असा संतप्त सवाल करीत आहेत. सध्या हा विषय ग्रामीण भागात काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेसचा पदवीधर मतदार काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या