25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउस्मानाबादकळंब येथे सेनेच्या अन्नछत्राचा ४० दिवसापासून लाभ

कळंब येथे सेनेच्या अन्नछत्राचा ४० दिवसापासून लाभ

एकमत ऑनलाईन

कळंब : रुग्णासाठी व नातेवाइकांची नाश्ता, जेवणाची अडचण निर्माण होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने हॉटेल बंद आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात जेवण कुठे करावे, असा प्रश्न नातेवाइकासमोर निर्माण झाला होता, गेल्या चाळीस दिवसापासून शिवसेनेच्या वतीने हा भटारखाना चालू असून, सध्या आंब्याचा मोसम चालू असल्याने रुग्णांना आंब्याच्या रस व पोळी, भाताची मेजवानी देण्यात आली. शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

येथील कोविड उपजिल्हा रुग्णलयातील औषधोपचार घेत असलेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी बुधवारी (ता. २८) पासून एकवेळ नाश्ता दोन वेळा जेवण मोफत देण्याची जबाबदारी घेतली आहे. हा उपक्रम तात्काळ सुरू करण्यात आला असून ,दररोज शंभर च्या वरी डब्बे घर पोच केले जात आहेत. व याची जबाबदारी शिवाजी कापसे टीमने छ.शिवाजी कॉलेज चे कमचारी ,शिवसेनेचे कार्य करते, नातेवाईकाना देण्यात आली आहे.

आठवड्यातून दोन वेळेस प्रतिकार शक्ती वाढिण्यासाठी चिकन, मटणचे जेवण दिले जात आहे, तर दररोज सकाळी वेवेगळ्या नाष्टा बरोबर अंडे दिले जात आहेत.रोज वेगवेगळे रुचकर व प्रतिकार शक्ती वाढवणारे जेवण दिले जात आहे, जवळपास रोज शंभर जणांना डब्बे दिले जात असून, आज रस, पोळीची मेजवानी देण्यात आल्याची माहिती शिवाजी कापसे यांनी दिली. रुग्णालयात शहरासह परिसराच्या रुग्णालयात रुग्णापेक्षा नातेवाइकांना स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा करून विविध भागातील कोरोना रुग्णाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चाळीस दिवसापासून हे अन्न छत्र सुरू करण्यात आले आहे.

मृग नक्षत्राची पहिल्याच दिवशी नांदेडात जोरदार सलामी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या