27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home उस्मानाबाद लोकसहभागातुन भाटशिरपुरा शाळेची झाली प्रगती : मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे

लोकसहभागातुन भाटशिरपुरा शाळेची झाली प्रगती : मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे

एकमत ऑनलाईन

मी जेव्हा या शाळेत रुजू झालो तेव्हा जीर्ण अवस्थेत असलेली आणि बाजूलाच स्मशानभूमी अशी शाळेची इमारत होती. शाळेतील मुले सुट्टीत स्मशानभूमीत खेळत, खेळण्यासाठी दुसरी जागा नाही अशा परिस्थितीत शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद गायकवाड आणि शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेला नवीन जागा मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि गावालगतच गायरानची अडीच एकर जागा मा.जिल्हाधिकारी यानी दिली. व खèया अर्थाने शाळेच्या विकासाला सुरुवात झाली.

जागा मिळाली, जिल्हापरिषदेच्या सहकार्याने शाळेची सुसज्ज अशी इमारत तयार झाली. झाडे लावली पण ती जनावरांनी खाल्ली, काही पाण्यावर वाळून गेली. शाळेला पाण्याची गरज होती. मी आणि तात्कालीन मुख्याध्यापक यांच्या साह्याने शाळेसाठी बोरवेल घेतला. पाण्याची समस्या दूर झाली. जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून शाळेसाठी खोल्या मिळाल्या.  संरक्षक भिंत नसल्यामुळे झाडे जगात नव्हती, सर्व शिक्षकांनी मिळून एकवीस हजार रुपये खर्च करून तीस लोखंडी संरक्षक जाळी ट्रीगार्डतयार करून घेतल्या.

शाळेच्या परिसरात झाडे लावली आणि संरक्षण जाळीमुळे झाडे जगली चांगली वाढली आणि शाळेच्या विकासाला सुरुवात झाली परिसर झाडांनी फुलांनी भरून गेला. आज गुलमोहर, वड, पिंपळ, लिंब, जास्वंद बॉटल फार्म बदाम फायकस सीता रंजन गुलाब अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे शाळेच्या परिसरात दिसतील. शाळेची नवीन इमारत होती. शाळेतील सर्व शिक्षक वृंद, गावातील पालक यांच्या मदतीने शाळेची रंगरंगोटी करण्याचे ठरवले. गावातून लोकवाटा गोळा केला.

गावातीलच पेंटर कमी मोबदला मध्ये शाळा रंगवण्यात तयार झाला. विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव देणारे वेगवेगळी चित्रे भीतीवर रेखाटली. प्रत्येक वर्गात त्यांच्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असे घटक भिंतीवर काढण्यात आले त्याचबरोबर घटकांसाठी आवश्यक अशी सुंदर चित्रे प्रत्येक वर्गात रेखाटली. मराठी, हिंदी इंग्रजी गणित समाजशास्त्र या सर्व विषयाशी संबंधित सर्व घटक घसरगुंडी, भिंतीवर काढण्यात आली. फक्त शाळेच्या भिंतीच नाही तर छतावर देखील सुंदर रंगरंगोटी करण्यात आली.

शाळेचा कायापालट करत असतान, लोकवाटा गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. शिक्षकांनी मिळून झेरॉक्स प्रिंटर शाळेसाठी खरेदी केले. त्याचबरोबर एक संगणक संच पंचवीस हजार रुपये किमतीचा खरेदी केला. विद्याथ्र्यांच्या खेळण्यासाठी शिक्षकांनी चार हजार रुपये खर्च करून मैदानावर लाल माती टाकली. विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे तसेच शालेय पोषण आहारात सेंद्रिय पालेभाज्या मिळाव्यात म्हणून परसबाग तयार करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी स्वतः परसबाग तयार करून त्यात पालक, मेथी कोथिंबीर वांगी भेंडी टोमॅटो मिरची इत्यादी भाजीपाला लावला. परस बागेतून विद्याथ्र्यांना कार्यानुभव आचे उत्पादक उपक्रमाचे शिक्षण मिळाले. शाळेच्या सुट्टीत विद्यार्थी परसबागेत रममाण झाले. परसबागेत वर्षातून दोन वेळा भाजीपाला घेतला जातो. या साठी शाळेतील शिक्षक दिलीप पवार ,श्रीमती प्रमोदिनी होळे,श्रीमती रंजना थोरात यांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले.

शाळेत होत असलेला हा बदल पाहून गावकरी देखील भारावून गेले होते. शाळेने परत पालक सभेचे आयोजन करून मदतीचे आवाहन केले तसेच जे गावातील लोक बाहेरगावी होते त्यांचा व्हाट्सअप ग्रुप माझा गाव माझी शाळा हा तयार करण्यात आला. शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे लोकांनी शाळेला भरभरून सहकार्य करण्यास सुरुवात झाली.

गावातील श्री अरविंद गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त शाळेसाठी ६० हजार रुपये खर्च करून देखणी असे प्रवेशद्वार बांधून दिले. शाळेचे माजी विद्यार्थी सध्या उत्पादन शुल्क अधीक्षक वर्ग पदावर कार्यरत असणारे केशव राऊत यांनी शाळा डिजिटल होण्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च करून तीन एलईडी संच शाळेत भेट दिली. गावातील श्री सुनील गायकवाड यांनी परीपाठासाठी आवश्यक असेल स्पीकर संच व दोन साऊंड बॉक्स २५००० रकमेचे शाळेसाठी भेट दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने १८००० रुपये किमतीचा एक एलईडी संच शाळेला भेट दिला. मेजर सूर्यकांत खापे यांनी पाच हजार रुपये किमतीचे प्रत्येक वर्गासाठी एक असे सात साऊंड बॉक्स दिले. संतोष साळुंखे यांनी पाच हजार किमतीचे नेत्यांचे फोटो फ्रेम आणि दोन हजार रुपये किमतीचे इंग्रजी शब्दकोश शाळेस भेट दिली. पालक श्री अमोल चाळक यांनी दोन चप्पल स्टँड दिले.

अशा पद्धतीने शाळेला मदतीचा ओघ सुरू झाला. शाळेचे ब्रीद वाक्य हरित डिजिटल आनंददायी शाळा असे आहे त्याप्रमाणे शाळेत वृक्षसंपदा वाढवून परिसर हिरवाईने नटलेला आहे. प्रत्येक वर्ग डिजिटल झाले आहे. विद्याथ्र्यांना खेळातून जास्त आनंद मिळतो म्हणून वेगवेगळ्या प्रकारची मैदाने जसे कबड्डी खो-खो लांब उडी उंच उडी हॉलीबॉल तयार केली असून सर्व खेळांची साहित्य शाळेत उपलब्ध आहे. क्रीडाशिक्षक प्रदीप रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले आणि मुलींनी सलग तीन वर्षापासून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच उंच उडी स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय आणि जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळविला आहे.

क्रीडा स्पर्धेत नाही तर प्रदीप रोटे आणि संजय झिरमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय, शिष्यवृत्तीचे जादा तास घेऊन नवोदय व दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्याथ्र्यांना सामान्य ज्ञान आवड निर्माण व्हावी म्हणून उपक्रमशिल शिक्षक सचिन तामाने यांनी प्रश्नमंजुषा हा उपक्रम सुरू केला आहे. दररोज पाच प्रश्न दिले जातात. हे प्रश्न अभ्यासक्रम व चालू घडामोडी वर आधारित असतात आणि प्रत्येक महिन्याला परीक्षा घेतली जाते. योग्य ते बक्षीस दिले जाते. या उपक्रमामुळे विद्याथ्र्यांचे अवांतर वाचन वाढले आहे तसेच ते वर्तमानपत्र आवर्जून वाचतात.

उपक्रमांमध्ये सहलीचे आयोजन करून परिसरातील ठिकाणांना भेटी देणे, परिसराची माहिती घेणे, अनुभव कथन करणे यासाठी उपक्मशिल शिक्षक सचिन तामाने आणि सहल प्रमुख प्रदीप रोटे यांनी सहलीचे आयोजन केले होते. तर उमरग्यातील काही शाळांनी आमच्या शाळेला सहली निमित्त भेट देऊन शाळेतील वेगळे उपक्रम, परसबाग, शाळेची रंगरंगोटी यांची पाहणी केली होती. एक शाळा आमच्या शाळेला भेट देण्यासाठी येणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.
शाळेच्या उपक्रमांमध्ये राजमाता जिजामाता विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम शाळेचे शिक्षक संजय झिरमिरे यांच्या देखरेखीखाली चालतो. सर्व विद्यार्थ्यांना बचत पासबुक दिले आहेत.

विद्यार्थी सुट्टीच्या वेळेत पैसे जमा करतात तसेच वही पेन त्यासाठी आवश्यक असतील तर पैसे काढतात. विद्याथ्र्यांना यामुळे गणिती क्रियांची आवड निर्माण होते. तसेच बँकेचे व्यवहार त्यांना बालवयातच समजतात. त्याचबरोबर बचतीची सवय लागते. विद्याथ्र्यांना इंग्रजीची आवड निर्माण व्हावी तसेच हसत खेळत इंग्रजी शिकता यावे म्हणून प्रदीप रोटे आणि शहाजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश स्पोकन क्टिविटी शाळेत सुरू आहे. यामध्ये वेगवेगळे इंग्रजी गेम्स, इंग्रजी कविता, इंटरव्यू इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्यामुळे विद्याथ्र्यांच्या मनातील इंग्रजीची भीती कमी होऊन शाळेत नवीन आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा ते इंग्रजीत इंटरव्यू घेतात. दिलेल्या घटनेनुसार संवाद सादर करतात.

शाळा दरवर्षी नवीन पद्धतीने नवीन विद्याथ्र्यांचे स्वागत करते. कधी विद्याथ्र्यांना फुले देऊन तर कधी फुगे देऊन तर कधी त्यांची बैलगाडीत मिरवणूक काढून तर कधी त्यांची रथात मिरवणूक कडून. त्यामुळे फक्त पहिलीच नाही तर सर्वच विद्याथ्र्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता असते. आज पर्यंत शाळेला खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर , आ.राणाजगजितसिंह पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ संजय कोलते,जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील,उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील,शिक्षणाधिकारी श्रीमती सविता भोसले , शिक्षण उपसंचालक श्री. जगराम भटकर तसेच जिल्ह्यातील अनेकआणि भेट देऊन शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले आहे.

अशीही भाटशिरपुरा जिल्हा परिषदेची शाळा , परसबाग, क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती, नवोदय, विद्यार्थी बचत बँक, प्रश्नमंजुषा, इंग्लिश स्पोकन क्टिविटी, गणिताची आवड, हॅप्पी अवर, वृक्ष लागवड वृक्ष लागवड आणि संगोपन, शैक्षणिक सहल इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबविणारी तसेच सुंदर रंगरंगोटी केली, भव्य क्रीडांगण असणारी, भव्य हँडवॉश स्टेशन असणारी, सुंदर वृक्ष संपत्तीने नटलेली माझी शाळा विद्याथ्र्यांना आनंददायी शिक्षण देते. त्यामुळे विद्याथ्र्यांनी क्रीडा क्षेत्रात यश मिळविले आहे त्याचबरोबर नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेत देखील विद्यार्थी यशस्वी होत आहेत. या सर्व बाबीची दखल घेऊन पंचायत समिती कळंब व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने भाटशिरपुरा शाळेला आदर्श शाळा व प्रेरणादायी शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

-बाळकृष्ण तांबारे

ताज्या बातम्या

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

आणखीन बातम्या

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ व ५० हजार मदत देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्दाला जागावे- आ. ठाकूर यांची मागणी

परंडा: मराठवाड्यासह अनेक भागात अतिवृष्टी व सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे व फळबागांचे खुप नुकसान झाले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने या सर्व...

कर्णबधिरांसाठी लवकर निदान, उपचार काळाची गरज

खासापुरी : लवकर निदान आणि लवकर उपचारामुळे (Early Identification Intervention)कर्णबधिर मुलांचा वाचा आणि भाषा विकास सर्वसाधारण मुलाप्रमाणे होऊ शकतो हे आता सिद्ध झालेले आहे....

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही ढोल, ताशे वाजवून होणार आक्रोश

उस्मानाबाद : सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता राज्यातील मराठा समाज पुन्हा आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही मराठा...

अग्रीकल्चर टेरिफ नुसार वीज शुल्क आकारणी करण्यात यावी, भूमच्या शेतकऱ्यांची मागणी

भूम: जिल्ह्यातील भूम, वाशी, कळंब, परंडा परिसर सतत दुष्काळग्रस्त असून येथील शेतकऱ्यांचे, महिला, युवक यांचे प्रामुख्याने जीवन्नोतीचे साधन दुध निर्मिती, प्रसिध्द खवा व पेढा...

तेर गावची बाजारपेठ महिन्यापासून बंद- सहनशीलता संपली

उस्मानाबाद (सुभाष कदम) : जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या तेर (ता. उस्मानाबाद) गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाने आतापर्यंत तेर गाव सहा वेळा...

स्वामी समर्थ केंद्रामध्ये पौर्णिमा मोहिते हिने केली सुंदर पेंटिंग

कळंब (सतीश टोणगे) : प्रत्येकाला काहींना काही छंद असतो,पण तो जोपासला पाहिजे तर च त्याचे कौतुक होत असते, कळंब येथील पौर्णिमा नितीन मोहिते हिने...

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना जिल्हाधिका-यांची कारणे दाखवा

उस्मानाबाद :  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवित्तर विद्यार्थ्यांच्या...

बायकोचा दुसरा विवाह झाल्याचे समजताच नवऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

उस्मानाबाद: बायकोचा आपल्यासोबतचा असणारा विवाह हा दुसरा विवाह असल्याचे समजताच नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. सदर घटना ही तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे...

आजअखेर ११ हजार ४५४ जणांना कोरोनाची लागण, ३४१ जणांचा मृत्यू

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मृत्यूदरही वाढतच आहे. आजअखेर जिल्ह्यात ११ हजार ४५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३४१ जणांचा...

कोरोनामुळे यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ब्रेक

तुळजापूर : सलग नऊ दिवस दररोज लाखो भाविकांची उपस्थिती असणारा श्रीक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने तोही भाविकांविना...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...