भोंदू महाराजाने केला बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार

0
593

अणदूर : वासनांध भोंदू महाराजांने भक्तावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. पोलिसात गुन्हा दाखल होईल म्हणून वासनांध भोंदू महाराज पळून जात असतांना अखेर इटकळ पोलिसांनी तब्बल पन्नास किलोमीटर पर्यंत पाटलाग करून अखेर या वासनांध भोंदू महाराजांच्या मुसक्या बांधल्या.

अधिक माहिती अशी की मौजे इटकळ येथे तीन महिन्यापूर्वी एक फिरस्ता वासनांध भोंदू महाराज आला व गांवापासुन जवळच असलेल्या महादेव मंदिरात आश्रयास थांबला. अंगात भगवे वस्त्र गळ्यात रुद्राक्षाच्या माळा व डोक्यावर भल्या मोठ्या जटा असा पेहराव असलेला हा वासनांध महाराज खरा साधूच वाटू लागला पण म्हणतात ना भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं या उक्ती प्रमाणे या भोंदू महाराजांची विकृत वृत्ती जागृत झाली.दिवसभर गांजाची नशा अंगात ठेऊन मदमस्त झालेला हा सोंग घेतलेला दिगंबर नामदेव गिरी महाराज खरा खुरा साधू नसून वासनांध असल्याचे खरे रूप उघडकीस आले.

चारच दिवसापूर्वी अणदूर येथील एक गरीब भक्त महादेवाची भक्ती करता यावी व देव रुपी साधू महाराजांची ही सेवा घडावी म्हणून आला होता.मात्र मंगळवार दि.७ जुलै च्या रात्री वासनांध दिगंबर नामदेव गिरी महाराज यांनी अंगाला तेल लाऊन मालिश करण्यास सांगितले त्या प्रमाणे सेवा करणारा भक्त या महाराजांचे अंग मालिश करू लागला.

त्या नंतर विकृत मनोवृत्ती असलेल्या या वासनांध महाराजाने भक्तांवरच बळजबरीने अनैसर्गिक संभोग केला.वेदनेने व्याकुळ झालेला भक्त अन्याय केलेल्या या वासनांध महाराजांस शिक्षा व्हावी यासाठी इटकळ पोलीस चौकी गाठली व घडलेली घटना सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते व पत्रकार केशव गायकवाड यांना सांगितले.तात्काळ पोलीस महादेव मंदिराकडे गेले पण फिर्याद दाखल होईल या भीती पोटी वासनांध दिगंबर गिरी महाराज सकाळी ११ च्या सुमारास मंदिरातून फरार झाला होता.

मग सहाय्यक राजाभाऊ सातपुते व त्यांचे सहकारी यांनी वासनांध महाराजा चा शोध घेऊ लागले तेव्हा हा दिगंबर गिरी महाराज तुळजापूर ते बार्शी कडे पायी पायी जात होते त्या वेळी पोलिसांनी त्या वासनांध महाराजांस ताब्यात घेतले व इटकळ औट पोस्ट येथे आणले अन्याय ग्रस्त भक्तांची रीतसर फिर्याद घेऊन वासनांध दिगंबर नामदेव गिरी यांच्या अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी भा.दं.वि.कलम ३७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे हे करीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Read More  व्यापा-यांच्या स्वागत समारंभाने गंगाखेडात पसरला कोरोना ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Comment moderation is enabled. Your comment may take some time to appear.