24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उस्मानाबाद कळंबच्या रुग्णालयात वापरात नसलेल्या व्हेंटीलेटर ची भाजप कडून महापूजा

कळंबच्या रुग्णालयात वापरात नसलेल्या व्हेंटीलेटर ची भाजप कडून महापूजा

एकमत ऑनलाईन

कळंब : मागील पाच महिन्यापासून देशांमध्ये कोरोना महामारी असल्यामुळे नरेंद्रजी मोदी यांनी पी एम केअर मधून तालुकास्तरावर रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. परंतु उपजिल्हा रुग्णालय कळंब मध्ये या वेंटिलेटरचा वापर न करता हे सर्व व्हेंटिलेटर असेच धूळ खात पडून आहेत .

यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वात आज उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरची महापूजा करुन शांत पद्धतीने आंदोलन करण्यात आले परंतु येणा-या सात दिवसाच्या आत सदरील व्हेंटिलेटर रुग्णांसाठी सुरू केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यासमयी देण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयात महा पूजा करत असताना भारतीय जनता पक्षाचे तालुकाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासोबत रामहरी शिंदे ,साहेबराव बोंदर, दिलीप पाटील,संजय जाधवर,माणिक बोंदर,शिवाजी गिड्डे, हरिभाऊ शिंदे ,सतपाल बनसोडे,अरुण चौधरी,संतोष कस्पटे, आबा रणदिवे,संदीप बाविकर,बबलू लोमटे,इम्रान मुल्ला,गणेश त्रिवेदी, अशोक क्षीरसागर, बंटी चोंदे आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात १२ हजाराच्यावर कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या