24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादजिल्हाभरात मंदीरे उघडण्यासाठी भाजपाचे आंदोलन

जिल्हाभरात मंदीरे उघडण्यासाठी भाजपाचे आंदोलन

जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य ; महाराष्ट्राचे, नवरात्रीतही दार बंद का भवानीचे ...?

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बार उघडले आहेत. परंतु अनेकवेळा विनंती करूनही महाराष्ट्राची अस्मिता असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास या सरकारने परवानगी दिलेली नाही. राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी धाराशिव शहराच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्यात मागील कित्येक महिने मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून कोरोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत पण केवळ महाराष्ट्रामध्येच बंद का? यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली असून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी धाराशिव शहराच्या वतीने ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी मंदिरासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

परंडा येथे भाजपाचे आंदोलन
राज्यात बार सुरु व मंदीर बंद या महाविकास आघाडी सरकारच्या काळ्या निर्णयाविरुध्द भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री काळभैरवनाथ मंदीर सोनारी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन करुन नाकर्ते राज्य सरकार विरुध्द घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

बंद असलेली धार्मिक स्थळे तात्काळ उघडण्यात यावीत : भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील
राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद या महाविकास आघाडी सरकारच्या काळ्या निर्णयाविरुद्ध भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व बुद्धिजीवी प्रकोष्ट प्रदेश संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने दि. १३ ऑक्टोंबर २०२० रोजी शहरातील हिप्परगा रोड लगत असलेल्या जगदंबा मंदिरासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करून या नाकत्र्या राज्य सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व तसेच लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील जगदंबा मंदिरासमोरही राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

कळंब येथे मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे ठिय्या आंदोलन
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बार उघडले आहेत परंतु अनेक वेळा विनंती करूनही महाराष्ट्राची अस्मिता असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास या सरकारने परवानगी दिलेली नाही. राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्यात मागील कित्येक महिने मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून कोरोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत पण केवळ महाराष्ट्रामध्येच बंद का? यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली असून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कळंब तालुका वतीने हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव कळंब येथील मंदिरासमोर भाजपा तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारच्या विरोधात भाजपचे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिर्थक्षेञात श्रीतुळजाभवानी मंदीर उघडण्यासाठी राजेशहाजी महाद्वार समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१३ ऑक्टोंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणास पुजारी, व्यापारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते. तुळजापूर शहरातील जनतेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपोषणाला श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर उपोषणाला आई दार उघड म्हणून मंदिर बंद उपाहार गृह, बार चालू उद्धवा अजब तूझा कारभार अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. तुळजापूर शहर गेले सात महिने मंदिर बंद असल्याने व्यापारी, पुजारी बांधव सर्व जणांची रोजी रोटी मंदिरवर अवलंबून आहे. तरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भाजपकडून उपोषणाला भारतीय जनता पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमाताई कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद माजीउपाध्यक्ष अर्चना पाटील, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधूरी गरड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी, अ‍ॅड. क्रांती थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लाक्षणिक उपोसणास आरंभ झाला. याची सांगता देविच्या आरती करुन करण्यात आला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या