31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादपिंपळा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा

पिंपळा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा

एकमत ऑनलाईन

काटी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाèयांच्या दुर्लक्षामुळेच कंत्राटदाराचे फावले असल्याचा आरोप नागरिकांतूून होताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द), पिंपळा (बुद्रूक), धोत्री, खडकी ते जिल्हा सरहद्द या १७ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम गतवर्षी करण्यात आले होते. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे काम अंदाजपत्रकानूसार करणे अपेक्षित होते. या रस्त्याच्या कामासाठी डांबराचा योग्य वापर करुन रस्त्याचा दर्जा उत्कृष्ट राखणे गरजेचे असताना संबंधित कंत्राटदाराने मनमानी कारभार करत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असून एक वर्षाच्या आतच या रस्त्यावर ठिकठिकानी मोठं-मोठे खड्डे पडले आहेत.

रस्ता जागोजागी खचला आहे. यामुळे कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले असून या कामाची तांत्रिक दृष्टीने सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. संपूर्ण १७ किलोमीटर रस्त्याचे काम नियमबाह्य स्वरुपाचे करण्यात आले आहे. जुन्या रस्त्यावर झाडू मारुन डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्याचे काम करतेवेळी योग्य प्रमाणात खडीचा व मुरुमाचा वापर केला नसल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. रस्त्याची व्यवस्थित दबई न केल्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता खचला आहे. परिणामी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे रस्ता खराब होत आहे.

पिंपळा (खुर्द), पिंपळा (बुद्रूक) या दोन्ही गावातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असून रस्त्यावर मंजूर असलेल्या पुलांची कामे अर्धवट स्वरुपाचे असुन पुलांना संरक्षक कठडे बनवले नसल्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याचे काम करतांना डांबर योग्य प्रमाण वापरले नसल्यामुळे रस्ता खचत आहे. रस्ता दबत असल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडत आहेत.

या रस्त्याच्या कामाकडे संबधित विभागातील अभियंत्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे कंत्राटदाराचे फावले आहे. संबंधित विभागतील वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याची सखोल तांत्रिक चौकशी करुन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लातूर शहर युवक कॉंग्रेस जनजागृती व स्वाक्षरी मोहीम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या