26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeउस्मानाबादमसला खुर्द खून प्रकरणी दोघांना अटक

मसला खुर्द खून प्रकरणी दोघांना अटक

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ज्ञानेश्वर करंडे खून प्रकरणातील दोघा आरोपींना तुळजापूर पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी अनिता भोसले हिला औसा येथून तर आरोपी रामेश्वर खोचरे याला उस्मानाबाद येथून अटक केली आहे. ज्ञानेश्वर करंडे यांचा सिंदफळ शिवारात खपले वस्तीजवळ अज्ञात मारेक-यांनी धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरूवारी दि. ९ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली होती.

या प्रकरणी चौघांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणात आडवा येत असल्याने सख्या मावस भावाने हा खून केला आहे. मसला खुर्द येथील ज्ञानेश्वर करंडे हे आपल्या टीव्हीएस मोटर सायकल क्रमांक एमएच १३ सीपी ७६०९ वरून मसला खुर्दकडे जात असताना खपले वस्तीजवळ आले. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी ज्ञानेश्वर करंडे यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण धारदार कत्तीने वार केले.

या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर आपली मोटार सायकल आणि मोबाइल घटनास्थळी टाकून फरार झाले होते. आरोपीच्या शोधासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या आदेशावरून व पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शोध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अनिला भोसले हिला औसा येथून तर रामेश्वर खोचरे याला उस्मानाबाद येथून अटक केली.

मृत ज्ञानेश्वर नाना कारंडे याच्या मावस बहिणी बरोबर रामेश्वर संभाजी खोचरे (रा. येवती ता. तुळजापुर) याचे प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमाला ज्ञानेश्वर कारंडे यांचा विरोध होता. मृत ज्ञानेश्वर कारंडे व आरोपी रामेश्वर खोचरे हे नात्याने सख्खे मावस भाऊ आहेत. जिच्या बरोबर प्रेम प्रकरण होते ती सुद्धा नात्याने मावस बहिण होती. या प्रेम प्रकरणाबाबत मृत ज्ञानेश्वर कारंडे याने आरोपीच्या घरच्यांना बोलावून बैठक घेतली आणि समज दिली. हे कृत्य समाजात बदनामी करणारे आहे.

यामुळे बदनामी होईल. तसेच मुलीच्या भविष्यासाठी आरोपीच्या नावावरील उस्मानाबाद येथील फ्लॉट मुलीच्या नावे केला होता. याचा राग मनात धरुन हा खून करण्यात आल्याचा संशय आहे. या बाबत मयताचा भाऊ भैरुनाथ नाना कारंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रामेश्वर संभाजी खोचरे, संभाजी खोचरे, परमेश्वर खोचरे, अनिता सतिष भोसले (रा. येवती) यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं २०९/२०२२ कलम ३०२,३४ भादंविसह ४.२५ आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या