36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादगॅस सिलेंडरच्या स्फोटात उपचार दरम्यान दोघाजणांचा मृत्यू

गॅस सिलेंडरच्या स्फोटात उपचार दरम्यान दोघाजणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

भूम : गॅस सिलेंडरच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
दोन दिवसांपासून या दोघांवर उपचार सुरू होते दि २६ आगस्ट रोजी बुधवार भूम तालुक्यातील आरसोली येथील भिक्षा मागून आपले व आईचे पोट भरणा-या मन्मथ गुरुलिंग विभूते (वय ७५) यांच्या घरात बुधवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास गॅस चा स्फोट झाला व मोठी दुर्घटना घडली, मात्र या दुर्घटनेत त्यांना व त्यांच्या १०५ वर्षाच्या आई भाजली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरसोली येथील ७५ वर्ष वयाचे मन्मथ विभूते व त्यांच्या आई काशीबाई गुरुलिंग विभूते वय वर्ष १०५ हे दोघेजण एकत्र राहत होते. बुधवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मन्मथ विभूते हे त्यांना व आईला चहा बनविण्यासाठी घरात गेले व लायटर सापडत नसल्याने त्यांनी काडीपेटी च्या साहाय्याने गॅस पेटवला मात्र अगोदरच गॅस लिकीज असल्याने व घर पूर्णतः बंद असल्याने अचानक गॅसचा भडका उडाला.

यात घरावरील पत्रे उडून घराच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या.मात्र बाहेर बसलेल्या शंभरी गाठलेल्या काशीबाई यांनी आवाज कशाचा झाला हे पाहण्यासाठी घरात येताच त्यांना आपला मुलगा पेटला असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मोठ्या प्रमाणात भाजले.ऐन लक्ष्मी च्या सणासुदीत ही दुर्दैवी घटना घडल्याने बुधवारी रात्री संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली गेली.

या घटनेची माहिती कळताच सरपंच प्रशांत मुंडेकर,अमोल खराडे यांनी दोन्ही माय लेकरांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पटवण्यात आले होते त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते . मात्र त्यांना प्रकृतीने साथ न दिल्याने यातील दोन्ही जखमी वृद्ध मायलेकरांचा शनिवारी मृत्यू झाला . त्यांच्या पश्चात मुलगा , मुली , सून असा परिवार आहे . दोघांवरही आरसोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा पो हे कॉ राकेश पवार ,तलाठी थोरात यांनी केला होता. या घटनेमुळे भूम परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश मूर्ती संकलनासाठी लातूर महापालिका प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या