24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादमंदिर, मशिदीतून ४५ हजार किंमतीचे पितळी हांडे लंपास

मंदिर, मशिदीतून ४५ हजार किंमतीचे पितळी हांडे लंपास

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : चोरट्यांना आता देवाचे देखील भय उरले नाही. असाच काहीसा प्रकार उमरगा तालुक्यात पहावयास मिळाला. उमरगा तालुक्यातील कोथळी येथे अज्ञात चोरट्यांनी मशिद व मंदिरामध्ये चोरी केली. सदर घटना १६ ते १७ ऑगस्ट दरम्यान घडली.

उमरगा तालुक्यातील कोथळी गावात महात्मा बसवेश्वर महाराज यांचे मंदिर व मुस्लिम समाज बांधवांची अजमत साहेब मस्जिद आहे. महात्मा बसवेश्वर मंदिरात ५० किलो ग्रॅम वजनाचा तर अजमत साहेब मस्जिदमध्ये २५ किलो ग्रॅम वजनाचा पितळी हांडा आहे. दोन्ही हंड्याची मिळून अंदाजे ४५ हजार किंमत आहे. दरम्यान, १६ ते १७ ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ठिकाणचे पितळी हांडे चोरून नेले. मंदिर व मस्जिदमधून पितळी हांडे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवानंद तुगावे यांनी मुरूम पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध २६ ऑगस्ट रोजी भादंसं ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या