23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादकोरोना संकट काळातही लाचखोरीचा कळस

कोरोना संकट काळातही लाचखोरीचा कळस

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सध्या कोरोना संकटामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लाच घेण्यात सुस्त असल्याचे महिला तलाठ्यांच्या लाचेच्या प्रकरणावरुन स्पष्ट होत आहे. प्लॉटची ऑनलाईन सातबा-याला नाव नोंद करण्यासाठी २५ हजार लाच घेताना उस्मानाबाद सज्जाच्या महिला तलाठी अर्चना श्रीमंत कदम या लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात गुरुवारी (दि.२३) अडकल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एसीबीकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद शहर सज्जा येथे तलाठी म्हणून अर्चना श्रीमंत कदम या कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदार यांना त्याचे व त्यांचे आजोबा यांचे प्लॉटचे ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी ३४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने तलाठी कदम यांच्या विरोधात गुरुवारी (दि. २३) लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलूचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून उस्मानाबाद शहरातील तलाठी कार्यालयात छापा टाकला.

यावेळी तलाठी अर्चना कदम यांनी ३४ हजारापैकी तडजोडीअंती २५ हजाराची लाच देण्याचे ठरले. ही लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांना लुटण्याचा प्रकार महसूलच्या अधिकाèयांकडून सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरqवद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक गौरीशंकर पाबळे, पोह.रqवद्र कठारे, पोना मधुकर जाधव, पो.शि.विष्णु बेळे, समाधान पवार, महेश qशदे, अर्जुन मारकड व चालक कांबळे यांच्या पथकाने केली.

सध्या सर्वत्र कारोना महामारी आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. हाताला काम नसल्यामुळे सर्वत्र बेरोजगारी आहे. त्यामुळे पै-पै पैश्यासाठी नागरिकांची फरफट सुरु आहे. याचे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना काहीच देणे-घेणे नसून संकटकाळातही अधिका-यामधून लूट सुरु असल्याचा या घटनेवरुन प्रकार लक्षात येतो. या कारवाईमुळे लाच घेणाèया महसूल विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Read More  नऊ कपाट, तीन खुर्च्या : किंमत तब्बल २ लाख ५४ हजार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या