31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादजिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात घरफोडी, लुटालूट, दरोडे, हाणामारी यासारख्या घटना सुरुच आहेत. दिपावलीनिमित्त घरातील नागरिक गावाकडे गेल्याचा फायदा घेवून घरफोडी होत आहेत. उस्मानाबाद शहरातील आदर्शनगर येथे घरफोडी होवून दागिन्यास रोकड असा १ लाख १४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. तर आंबेजवळगा (ता. उस्मानाबाद) शिवारातील पत्र्याच्या शेडचा दरवाजा तोडून मोबाईलसह ७० हजाराची रोकड पळविली. वाशी तालुक्यातील यसवंडी येथे घरफोडी होवून दागिने लंपास केले आहे. या तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत लाखों रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील आदर्श नगर येथील सच्चिदानंद पांडूरंग उंबरे हे गुरुवारी (दि.१२) कुटूंबीयांसह वाणेवाडी येथे गेले होते. ते गुरुवारी (दि.१९) घरी परतले असता घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने नकली चावीच्या सहायाने उघडून घरातील ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने- वस्तू, कॅसीओ कंपनीचे घड्याळ व ७ हजार रोख रक्कम असा १ लाख १४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सच्चिदानंद उंबरे यांनी शुक्रवारी (दि.२०) दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तर उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगा शिवारातील सुदर्शन पाटील यांच्या शेतातील पत्रा शेडचा दरवाजा अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (दि. २०) रात्री ३ वाजण्याच्या सुमारास उघडून आतील सुटकेसमध्ये ठेवलेली ७० हजार रुपये रोख व आयटेल कंपनीचा एक मोबाईल चोरुन नेला.

याप्रकरणी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २१) गुन्हा नोंदवला आहे. तसेच वाशी तालुक्यातील यसवंडी येथील बाळु रामलिंग जाधव हे १० नोव्हेंबर रोजी कुटूंबीयांसह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी (दि.२०) सकाळी ते घरी परतले असता घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील १५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बाळु जाधव यांनी शुक्रवारी (दि. २०) दिलेल्या फिर्यादीवरुन वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
185FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या