उस्मानाबाद : भूम तालुक्यातील अंतरगाव येथील घरावर अचानक पोलिसांना छापा टाकून गांजा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथील एका घरातून ६४.५ किलोग्रॅम गांजा जप्त केला. पाज जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत परंडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भूम तालुक्यातील चिंचोली फाटा येथे मंगळवारी (दि.१०) भूम पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रात्री इंडीका कार क्र. (एम.एच. ०६ एबी ६४५७) मध्ये असणाèया चौघा व्यक्तींना ५०.३० कि.ग्रॅ. गांजा ताब्यात घेतला होता.
याबाबत त्यांच्यावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सुभाष आण्णा पवार (रा. वांगी (खु.), ता. भूम) याच्या शोधार्थ भूम पोलीस ठाण्याचे पोनि. रामेश्वर खनाळ यांचे व परंडा पोलीस ठाण्याचे सपोनि. राजकुमार ससाणे, पोना. खोसे, कळसाईन, काटवटे, महिला पोना- मुल्ला यांचे संयुक्त पथक परंडा हद्दीत फिरत होते. दरम्यान या संयुक्त पथकाने अंतरगाव रस्त्यावरील सुभाष आण्णा पवार याच्या घरावर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५.३० वा. सु. नायब तहसीलदार श्वेता अल्हाट व २ शासकीय पंचांच्या समक्ष छापा टाकला. यावेळी सुभाष पवार याच्या घरात २२ कागदी पुडक्यांत ४८.५ कि.ग्रॅ. गांजा अंगनात उभ्या असलेल्या इनोव्हा कार (क्र. एम.एच. २५ एके १७७७) च्या डिकीत ५ कागदी पुडक्यांत १०.८ कि.ग्रॅ. गांजा व महिंद्रा पिकअप क्र. एम.एच. २५ पी १२२५ च्या पाठीमागील हौद्यातील गोपनीय कप्प्यात लपवलेल्या एका पिशवीतून ६ कि.ग्रॅ. गांजा असा एकुण ६४.५८ कि.ग्रॅ. गांजा जप्त केला.
यावेळी घरात असणा-या सुभाष आण्णा पवार, रामदास आण्णा पवार, अमोल सुभाष पवार, आण्णा रामदास पवार (सर्व रा. वांगी (खु.), नागेंद्रबाबु सालु जेमेल्ली (रा. विशाखापट्टनम, राज्य- आंध्रप्रदेश) यांना पथकाने अटक करुन त्यांच्याविरुध्द परंडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम- २० (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात