21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादइंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुतार यांच्या चित्रांची नोंद

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुतार यांच्या चित्रांची नोंद

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : तुळजापूर तालुक्यातील सिंदगावचे रहिवाशी जगदीश बसवराज सुतार हे त्यांच्या कलेचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेवून कौतुक केले आहे. सुतार हा यावर्षी इयत्ता बारावी सायन्समध्ये शिकतोय.लहानपणीपासून त्याला चित्रकलेची, रांगोळी व गायनाची खूप आवड आहे. सतत शालेय सर्व कार्यक्रमात, खेळांत प्रथम दहावी संपली आणि खऱ्या चित्रकला, रेखाटन कलेच्या आयुष्यात झेप घेतली, अनेक प्रकारचे वॉटर कलर पेंटिंग, ऑईल पेंटिंग खास करुन काढल्या आहेत.

स्केचिंगसाठी त्याला खूप लोक ओळखतात, घरची परिस्थिती बेताची आई शिवणकाम करते आणि वडील शाळेत भात बनवतात, घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतः पेंटिंगचे काम, शेतात काम करून त्याने कलेवर प्रेम करून, प्रयत्नांवर भर दिला आहे. आजपर्यंत त्याने अनेक नेत्यांची, अभिनेत्यांचे स्केचेस काढलेले आहेत. त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी फॉर्म भरला होता आणि त्यात त्याला यश देखील मिळाले. भारत सरकारद्वारे कला-क्रिडा-शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरीला कौतुक म्हणुन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात पात्र व्यक्तींची व त्यांच्या कार्याची नोंद केली जाते.

यामध्ये माझी निवड करण्यात आली आणि आज या रेकॉर्ड होल्डिंगच्या संबंधित राष्ट्रीय प्रमाणपत्र, मेडल, आय.बी.आर. होल्डर आय.डी. कार्ड, आय.बी.आर. बॅच, कार स्टिकर्स आणि अद्वितीय असा अमूल्य असा पेन देऊन कौतुक करण्यात आले. आजपर्यंत आपण सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन केलात, प्रोत्साहन दिले या मुळेच मी हे यश गाठू शकलो अशी प्रतिक्रिया जगदीश सुतार यांनी दिली. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक ही आहे.

मेहमूद : हुकमी विनोदवीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या