25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeउस्मानाबादसरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या पती-पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या पती-पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणार्‍या दोघांविरूद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक मुनिर शेख, सुरज गायकवाड, आनंद खारवे, वाल्मिक खारवे, निशांत काबळे यांचे पथक शहरातील शौचालयांची तपासणी व साफसफाई १९ जुलै रोजी पहाणी करत फिरत होते.

दरम्यान, शहरातील दुर्गानगर येथे पथक गेले असता तेथील रहिवासी सुनिता व लक्ष्मण बंडगर या दोघांनी अगोदर रस्ते व नाल्या व्यवस्थित करा, अन्यथा आम्ही घंटागाडी पुढे जाऊ देणार नाहीत, असे पथकास म्हणून पथकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच झाडाची फांदी तोडून आनंद खारवे यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले. याशिवाय, घंटागाडीची चावी काढून घेऊन गाडीसमोर लोखंडी पलंग व दगड टाकुन गाडी आडविली.

याप्रकरणी आनंद खारवे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बंडगर पती-पत्नीविरूद्ध शासकीय कर्मचार्‍यांच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २० जुलै रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या