तुळजापूर : भीक मागण्यासाठी आपल्या लहान मुलांना प्रोत्साहन देणार्या तुळजापूर शहरातील पालकांवर 25 नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिकमल पारधी पिढी येथील गोरख काळे, सुमन काळे, शहाजी काळे, कोंडाबाई पवार, कोंडाबाई काळे व तुळजापूर शहरातील उमाबाई शिंदे या सर्वांनी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर त्यांच्या 6 ते 12 वयोगाटातील बालकांना येणार्या-जाणार्या भाविकांकडून भिक मागण्यास प्रोत्साहन दिले आहे.
त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले. या प्रकरणी विस्तार अधिकारी तुळजापूर नागेश वाकडे यांनी दि. 25 नोव्हेबंर रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बालकाची काळजी व संरक्षण अधिनियम कलम- 76 व महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कलम- 11 अंतर्गत पालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.