24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादमांजरा धारण ओव्हरफ्लो; सहा दरवाजे उघडले

मांजरा धारण ओव्हरफ्लो; सहा दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : उस्मानाबाद बीड आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख ज लस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी (दि. २१) दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज बुधवारी (दि. २२) सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतीसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सरू करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यन्त धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी ६ धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.

दरम्यान, सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही वरुणराजा दमदार बरसल्याने सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मांजरा प्रकल्पात प्रथम 1980 साली 97 दलघमी पाणी साठा झाला,या नंतर 1988 मध्ये हे धरण प्रथम भरला.पुढे 1989,1990 असे सलग दोन वर्ष ओव्हर फ्लो झाला होता. 2005, 2006 या साला सह 2010,2011,2016,2017 तसेच 2020 व 2021मध्ये पूर्ण संच य पातळी गाठली.1996,1998, या सह 2000,2008 व गत वर्षी 2020 मध्ये ओव्हर फलो झाला होता. अशा प्रकारे 14 वेळा पूर्ण पाणी साठा झाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या