27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeउस्मानाबादछत्रपती शिवरायांच्या कळंबच्या महारांगोळीची विश्वविक्रमात नोंद

छत्रपती शिवरायांच्या कळंबच्या महारांगोळीची विश्वविक्रमात नोंद

एकमत ऑनलाईन

कळंब : शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात येथील शिवजयंती महोत्सव नावारुपाला आला आहे. याच पाश्र्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी कळंब शहरात शिवजयंतीचे औचित्य साधत श्रीमंतयोगी युवा मंच कळंब यांच्या वतीने राजकुमार कुंभार यांनी शिवाजी महाराजांची १९ हजार २०० चौरस फुट आकारातील भव्य दिव्य महारांगोळी विश्वविक्रम करण्याच्या उद्देशाने साकारली गेली होती.

शिवजयंती महोत्सवामध्ये मिळालेल्या शिवभक्तांच्या उदंड प्रतिसादानंतर मागील अडीच वर्षापासुन या महारांगोळीचे विश्वविक्रमात नोंद व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते. उशिरा का असेना पण कळंबच्या इतिहासातील आत्तापर्यंतची छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वात मोठी, एका कलाकाराने साकारलेली महारांगोळी म्हणून रिकॉर्ड बुकमध्ये नोंद घेतली गेली आहे.

या कलाकृतीच्या विश्वविक्रमी नोंदीने कळंबच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवल गेला असल्याची माहिती राहुल कुंभार यांनी दिली. शिवजयंती महोत्सव २०१८ ला महारांगोळी काढण्यात आली होती, यासाठी ४,७२५ किलो रंगीत रांगोळी लागली तर काढण्यासाठी ३१ तास ४५ मिनिट लागले.

Read More  फुलवळच्या आठ जणांनी केली कोरोनावर मात

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या