16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeउस्मानाबादबाल दिन विशेष

बाल दिन विशेष

एकमत ऑनलाईन

मुले म्हणजे देवाघरची फुले, असे वचन आपण अनेकवेळा ऐकतो, हो की नाही? नक्कीच ऐकले असणार ! आणि हो, मुलं असतातंच हं देवाघरची फुलं! थोर संत तुकोबा राया म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, असे ऐकले ना की, प्रत्यकोला बालपण नक्कीच आठवणार म्हणजे आठवणारच. हो ना? मला माहितीय तुम्ही तुमच्या बापलपणाच्या आठवणीत रंगलात. बालपण हे असतेच तसे निरागस, गोंडस, अल्लड, निश्चींत आणि दिलखुलास बरं का! बालपणात ना कालची भ्रांत ना उद्याची चिंता. एकदम बिनधास्त आणि दिलखुलास बरं का? तुम्ही म्हणाल असे मी का बरे सांगतोय? तर त्याचं कारण आहे आज बालदिवस हो, चाचांचा वाढदिवस! तुम्हाल म्हणाल कोण हे चाचा? बरोबर ओळखलंत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु. त्यांचा जन्मदिवस आहे आज.

त्यांचा जन्मदिवस बालदिवस किंवा बालदिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण सर्वांनी मिळून बालदिन साजरा करुया. आजच्या दिवशी प्रत्येकाने बालपणात जगूया. खेळूया, बागडू या, आनंदात दिवस घालवू या. कारण आज आहे चाचांचा जन्मदिवस त्यांचा जन्म १४ नाव्हेंबर १८८९ रोजी झाला. चाचा नेहरुंना लहान मुले खूप आवडत. ते नेहमी शाळेतील मुलांना भेटत असत. त्यांच्यासाठी भेट वस्तू घेवून जात असत. त्यामुळे ते मुलांचे लाडके चाचा म्हणून ओळखले जातात. चाचा म्हणजे मुलांचे जीव की प्राण. मुलांप्रमाणेच चाचांना गुलाबाची फुले खूप आवडत. त्यामुळे ते नेहमी आपल्या कोटच्या खिशाला गुलाबाचे फुल लावत असत. त्यांना मुले आणि फुले खूप जवळची वाटत. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असहे यांना वाटे. त्यामुळे सन १९५६ रोजी पहिला बालदिन साजरा करण्यात आला. तेंव्हापासून दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात

तुम्ही म्हणाल बालदिवसाचे महत्व काय? साजरा करण्याचे औचित्य काय? त्याचं अस्सं की, भारतामध्ये मुलांची संख्या ही जगाच्या कोणत्याही देशापेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे बालकांना खूप महत्वाचं स्थान आहे. कारण आजची मुले ही भविष्यातील नागरिक आहेत. हो की नाही. बालदिनाच्या निमित्तानं मुलांच्या-बालकांच्या वास्तविक परिस्थितीची जाणीव सर्वांना व्हावी. बालकांच्या विकास, सुरक्षा हक्के, याविषयी जागृती व्हावी. त्याचबरोबर मुलांमध्ये ही जागरुकता निर्माण व्हावी. तसेच बालक हे उद्याचे भविष्य आहे. हे विसरुन चालणार नाही हे नक्की! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मिळून प्रत्येक स्तरावर काहीतरी केले पाहिजे. याचा विसर पडू नये, यासाठी बालदिवस साजरा करणे महत्वाचे ठरते. तुम्ही म्हणाल कसे का? तर भारत सरकारच्या बालहक्क कायद्याच्या सर्वेक्षणातून बालकांची वास्तविक परिस्थिती समोर आली आहे ती म्हणजे देशामध्ये लाखो मुले पोरकी-अनाथ आहेत, आजारी आहेत, कुपोषित आहेत, लैंगिक अत्याचाराने पीडीत आहेत.

शोषण झालेल्या मुलांची संख्याही काही कमी नाही. अनेक मुले भीक मागणारी आहेत. बाल कामगार मुले, तस्करीस बळी पडलेली मुले, बालविवाहाची बळी मुले, अशी खूप सारी मुले आजही कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. म्हणून आपण सर्वांनी समाजातील घटक या नात्यानं आपली जबाबदारी पार पाडूया. ती म्हणजे बालकांना त्यांचं हक्क देऊया. हो की नाही ? चला तर मग सर्वजण मिळून ठरवूया-बालकांसाठी सजग होऊया. देशाच्या भविष्यासाठी हातभार लावूया. अरेरे ! तुम्ही म्हणाल बालदिनाविषयी सांगता सांगता कोठे घेऊन आलो. खरे म्हणजे आजच्या बालदिनी बालकांना त्यांचा हक्क मिळवून देणं ही आपली सर्वांची जबाबदारी असून ही जाणीव जागृत ठेवूया. हो की नाही.

मित्रांनो जवाहरलाल नेहरु म्हणजेच चाचा नेहरु, पंडीत नेहरु होत. अत्यंत चाणाक्ष, विद्वान, उच्च विद्या विभूषित असे सर्वांचे आवडते चाचा. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरु. आई स्वरुपाराणीदेणी. पत्नी कमला नेहरु. असे कुटूंब! स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी. प्रसंगी तुरुंगवास भोगणारे नेते. अनेक आंदोलनांचे आंदोलनार्थी, भारत छोडो ही क्रांती घोषणा त्यांचीच! लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते-चाचा, धर्मनिरपेक्षतेचे पुजारी-चाचा, देशाचा विकास साधणारे विकास पुरुष -चाचा, ६ वेळा कारवास काँग्रेसचे अध्यक्ष राहणारे एकमेव नेते-चाचा, ९ वेळा कारावास भोगणारे स्वातंत्र्य सेनानी-चाचा, गरिबांचे कैवारी, लोकसेवक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार-चाचा होय. आपल्या आवडत्या चाचांचा मृत्यू २७ मे १९६४ रोजी झाला.

चाचा नेहरु
गुलाब ज्यांच्या खिशात छान.
चाचा नेहरु आहेत महान.,!!
आवडत ज्यांना लहान मुल
हसत राहायचे नेहमी बिलकूल!!
मुलांना ते आवडायचे खूप
द्यायचे त्यांना भेटवस्तू खूप-खूप.!!
मुले त्यांना म्हणायची चाचा
सगळीकडे त्यांच्या प्रेमाची चर्चा,!!
भारत मातेचे ते महान लाल,
मिळवून स्वातंत्र्य केली कमाल,!!
शांतीचे ते होते दूत
होते ज्ञानी आणि पंडीत.!!
चाचांचा आम्हाला आहे खूप गर्व
त्यांनी देशासाठी अर्पण केले सर्व.!!
बालदिवस मुलांच्या साठी
त्यांचे हक्क त्यांना मिळण्यासाठी.!!
चाचा नेहरुंचं मुलांशी जवळचं नातं
म्हणून बालदिवस साजरा केलं जातं.!!

-संजय देवराव चव्हाण
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, कामेगाव
ता. जि. उस्मानाबाद.
मो.नं. ९७६३४३३९३९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या