25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeउस्मानाबादकळंबमध्ये आणखी रुग्ण आढल्याने नागरीकांची चिंता वाढली

कळंबमध्ये आणखी रुग्ण आढल्याने नागरीकांची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

कळंब : कळंब शहरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. शहरातील सोनार गल्ली येथील ४८ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. सदरील महिला सध्या बार्शी येथे उपचार घेत आहे. तिच्या संपर्कात ६० ते ७० जण निघतील, असा अंदाज असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ. वायदंडे यांनी सांगितले. त्यामुळे कळंबकरांची चिंता वाढली आहे.

संपर्कातील लोकांना शोधण्याचं काम सुरू आहे. खबरदारी म्हणून शहरातील भवानी चौक ते वाघमारे पॉवर लाऊंड्री हा परिसर कंन्टेनमेंट झोन करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वाब घेण्यात आले आहेत. व त्यांना कळंब येथील परळी रोडवरील प्रेरणा हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे सामान्य माणसाचा स्वाब घेतल्यास त्यांना प्रशासनाकडून ठरवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येतं, मात्र या विशिष्ट लोकांनाच आलिशान हॉटेलमध्ये थांबण्याची परवानगी प्रशासनाने कशी काय दिली, असा सवाल सध्या शहरात चर्चिला जात आहे.

तसेच इतरांनीही घरी किंवा हॉटेलमध्ये क्वाराईनटाईन व्हायची इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाही तशी परवानगी देण्यात येईल का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे नागरीक चिंतेत आहेत तसेच आर्थिक नुकसानही होत आहे.

Read More  नगरपरिषद कर्मचा-यांचे काळ्या फिती लावुन कामकाज

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या