लोहारा : व्यवस्थापन व नियोजन नसलेल्या ठिकाणी नगरपंचायतने ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून दै एकमत ने स्वच्छता बाबत गेल्या दोन दिवसांपासून लोहारा शहरात स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा, स्वच्छतेचे मात्र तीन तेरा या सदराखाली वृत्त प्रकाशित करताच दि. २२ जुलै रोजी सकाळपासून सर्व सौचालय, मुतारी साफसफाई करीत नुसत्या पाण्याचा फवारा मारण्यात आला. कुठलेही निर्जंतुकीकरण पावडर अथवा फवारणी करण्यात आली नसली तरी तूर्त तरी मुतारी व सौचालय साफसफाई करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक सौचालय असलेल्या ठिकाणी पाण्याचे नियोजन नसल्याने बंद अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणचे शौचालयमधील भांडे मोडकळीस झाले आहेत. सौचालय जवळ पाण्यासाठी हौद बांधण्यात आले आहेत तर कुठे पाण्यासाठी qसटेक्सचा वापर केला असला तरी आदी ठिकाणी अनेक महिन्यापासून या टाकीत पाण्याचे नियोजन नसल्याने व घाणीच्या साम्राज्यामुळे बंद अवस्थेत असलेल्या सौचालयात पाण्याचा फवारा मारून तू कर मारल्यासारखे मी करते रडल्यासारखे या उक्ती प्रमाणे आज रडक्याचे डोळे पुसण्यागत स्वच्छता केली असल्याने नागरिकांतून हशा होत आहे.
शासनाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून लाखो रुपये निधी दिला जातो. परंतु प्रत्यक्षात स्वच्छता बाबत उदासीनता दिसत असल्याने अनेक सौचालयाची अवस्था बेवारशी झाली आहे. कुठलेही नियोजन नसल्याने पाईपलाईन, पाण्याचे हौद, सटेक्स टाकी, भांडी, दरवाजे तुटून सौचालय बंद झाले पडले आहेत.
तरी महिनाकाठी ठेकेदाराला लाखो रुपयांचे बील अदा केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून सदर या गंभीर बाबीचे संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन प्रत्यक्ष दर्शनी पंचनामा करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तर या कारभारावर संताप ही व्यक्त केला जात आहे. अशा या ढिसाळ नियोजन करणा-या संबधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Read More किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना