23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादतुळजापूर तहसीलचा कारकून ३ हजारांची लाच घेताना अटकेत

तुळजापूर तहसीलचा कारकून ३ हजारांची लाच घेताना अटकेत

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : महसूल कर्मचा-यांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे झालेली वेतन निश्चिती चुकीची झाली होती. सुधारित वेतन निश्चिती करून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना तुळजापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दि. ८ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे केली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महसूल विभागात कार्यरत आहेत. तक्रारदार यांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे झालेली वेतन निश्चिती ही चुकीची झाली होती. सदरची सुधारित वेतन निश्चिती करून दिल्याचा मोबदला म्हणून तुळजापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून चंद्रकांत माणिकराव गोरे(४७) हे तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी करीत होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी तहसील कार्यालयात सापळा रचला होता. अव्वल कारकून गोरे यांनी पंचांसमक्ष ३ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून दि. ८ रोजी ३ हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली.

ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक विकास राठोड यांनी पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, विशाल डोके, विष्णू बेळे यांचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या