23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeउस्मानाबादनामांतरावरून राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

नामांतरावरून राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे असा ठराव राज्याच्या मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विरोध करणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी दि. १ जुलै रोजी सामुहिक राजीनामे दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या निर्णयाचे हिदुत्ववादी संघटनानी स्वागत केले आहे. परंतु मुस्लीम समाज दुखावला गेला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाचे महावविकास आघाडी सरकार सत्तेवर होते. नामांतराचा ठराव घेताना या ठरावाला धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध करणे गरजेचे होते, असे मुस्लीम समाजाचे म्हणणे आहे. तसे न होता कोणत्याही मंत्र्याने या ठरावाला विरोध केला नाही.

ठरावानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात मुस्लीम समाजाच्या विविध संघटना यांच्याकडून याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या प्रस्तावाला विरोध करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी विरोध न केल्याने राजीनामा देत असल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यात प्रदेश सचिव मसुद शेख, शहराध्यक्ष आयाज शेख, कादरखान पठाण, खलीफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असद खान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बाबा फैजोद्दीन, मोनोद्दीन पठाण, मन्नान काझी, अन्वर शेख, अतीक शेख, मन्नान काझी, सरफराज कुरेशी, लईक सरकार, आवेज मोमीन, महेमुद मुजावर, जाकेर पठाण, मंजूंर भाई, ईस्माईल काझी, गयाज मुल्ला, ईलीयास पिरजादे, बीबाल तांबोळी आदी पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या