24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद जिल्हाधिका-यांची दिव्यांगाप्रती माणुसकी

जिल्हाधिका-यांची दिव्यांगाप्रती माणुसकी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : आपल्या कार्यालयात समस्या घेऊन भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नसल्याचे लक्षात आल्यावर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चक्क जमिनीवर बसून दिव्यांग व्यक्तीच्या समस्या ऐकल्या. दिव्यांग व्यक्तीच्या समस्या ऐकतानाचा जिल्हाधिका-यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत जिल्हाधिका-यांनी दाखवलेल्या माणूसकीचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.

उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी लाभल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. त्यात एका दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी चक्क जमिनीवर बसल्याचा फोटो पाहून अनेकांना कौतूक वाटत आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिव्यांग व्यक्ती आपल्या समस्या घेवून आला होता. त्याला खर्चीवर बसता येत नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपली खुर्ची सोडून त्याच्यासोबत जमिनीवर बसले आणि त्याची समस्या ऐकून घेतली.

यावेळी दिव्यांग व्यक्तीसोबत आलेल्या व्यक्तीने त्याचा फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची कार्यपद्धती आजपर्यंत उस्मानाबादकरांनी अनुभवलेल्या जिल्हाधिका-यांपेक्षा जरा वेगळीच आहे. त्यांच्या कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या व्यक्तींची अडचण समजून घेतात.

लागलीच त्यांची समस्या कोणत्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाच्या प्रमुखाला तक्रारदारासमोरच फोन लावतात. तातडीने समस्या निकाली काढण्याची सूचना देतात. त्यामुळे समस्या तात्काळ निकाली निघत असल्याने अनेकांच्या चेह-यावर हास्य फुलत आहे. जिल्हाधिका-यांनी दर सोमवारी अभ्यांगतांना भेटण्यासाठी दिवस ठेवला आहे. जिल्हाधिकारी प्रत्येकाची तक्रार, समस्या आस्थेवाईकपणे ऐकून घेऊन निकाली काढत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची अल्पावधीतच जिल्हाभर चर्चा सुरू आहे. दिवेगावकर यांच्यासारखे जिल्हाधिकारी लाभल्याने समाधान आहे.

शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या