21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादशेतक-यांना हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या

शेतक-यांना हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे न करता सरसगट हेक्टरी ७५ हजार रूपये शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात काँग्रेसच्या वतीने सोमवारी दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंर्त्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात २७ जूनपासून ७ ऑगस्ट पर्यंत सलगपणे पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन पीकाचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील शेतर्क­यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडून गेलेले आहे. नुकसान मोठे असल्याने शेतकरी हताश झालेला आहे. सोयाबीन पीक संपूर्णपणे पाण्याखाली गेलेले असून या संदर्भात पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सरकारने शेतक-यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण मदतीपेक्षा जास्तीची मदत करण्याची गरज आहे.

सरकारने नुकसानीचे पंचनामे न करता शेतक-यांना प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये ४ हेक्टर पर्यंत सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन देताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धिरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, लक्ष्मण सरडे, खलील सय्यद, रोहित पडवळ, अशोक शिंदे, अ‍ॅड. गणपती कांबळे, अमर मगर आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या