23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादलोहारा नगराध्यक्षाच्या विरोधात उपनगराध्यक्षानी दिली जिल्हाधिकारी यांना तक्रार

लोहारा नगराध्यक्षाच्या विरोधात उपनगराध्यक्षानी दिली जिल्हाधिकारी यांना तक्रार

एकमत ऑनलाईन

लोहारा : नगरपंचायत लोहारा हद्दीतील महाराष्ट्र शासन पुनर्वसन मधील जमीन बेकायदेशीरपणे बनावट कागदपत्रे तयार करून कुटुंबातील सदस्यांच्या नावे करून आपल्या पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी नगरपंचायत सदस्यत्व व नगराध्यक्षपद हे अपात्र करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन लोहारा नगरपंचायत उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की नगरपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा नगराध्यक्ष यांनी महाराष्ट्र नगर पंचायत अधिनियम १९६५ कलम १६, ४४, ४५ व ४६ या कलमाचे उल्लंघन करून स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून तसेच नगरपंचायतचे सर्व कायद्याचे ज्ञान असताना आपल्या परिवाराच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासन भूकंप पुनर्वसन मधील उर्वरित जमीन नगरपंचायतला बेकायदेशीरपणे नोंद घेऊन विद्यमान नगराध्यक्ष यांचे सासरे यांच्या नावे बोगस कागदपत्राअधारे खरेदी खत करून कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता अल्पदरात खरेदी करून शासनाची फसवणूक केली आहे तसेच महाराष्ट्र शासनाची जमीन बनावट कागदपत्राद्वारे त्यांचे सासरे यांच्या नावे खरेदीखत करताना नगराध्यक्ष यांचे पती यांनी नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून खोटी नोंद घेऊन ते स्वतः संबंधित प्लॉटच्या खरेदी खात्यामध्ये साक्षीदार आहेत.

तसेच नगर पंचायतच्या सदस्या तथा नगराध्यक्षा सौ ज्योती दिपक मुळे यांनी परिवाराच्या फायद्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाèयांवर दबाव टाकून बनावट कागदपत्रे तयार करून यांचे सासरे यांना संदर्भीय विषयांमधील सर्वे नंबर मध्ये प्लॉटची बनावट घेऊन शास्त्री यांना खरेदीखत करण्यात मदत करून आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी तसेच लोहारा नगर पंचायत सदस्य तथा नगराध्यक्ष मुळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याने ते महाराष्ट्र नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलमानुसार उल्लंघन केल्याने त्यांचा नगर पंचायत सदस्य तथा नगराध्यक्ष म्हणून अपात्र ठरवण्यात यावे अशा आशयाचे निवेदनाद्वारे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कुठलेही कागदपत्र आपल्या कार्यकाळात तयार करण्यात आलेले नसून मूळ कागदपत्रांच्या आधारे शासकीय नियमानुसार सदरील जमिनीचे खरेदीखत माझे सासरे यांनी केले आहे. जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे व राजकीय आरोप आहेत.
-ज्योती दिपक मुळे, नगराध्यक्ष न. पं., लोहारा

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या