22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादकळंब येथे ई-पास देताना नागरिकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार

कळंब येथे ई-पास देताना नागरिकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार

एकमत ऑनलाईन

कळंब : कोरोनामुळे संपूर्ण देशभरात टाळेबंदी सुरू आहे. यामुळे जिल्हा बंदी असल्याने नागरिकांना अतिआवश्यक व शेतीच्या कामासाठी तहसील कार्यालयाकडून ई-पास घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी तहसील कार्यालयातील आप्पती विभागाकडून पास देण्यात येतो,मात्र या विभागाकडून पास देताना नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून मागणी केल्यापासून १० ते १५ दिवस ई-पास दिला जात नसल्याची बाब समोर आली आहे. जवळच्या व्यक्तींना संबधीत विभागाकडून तात्काळ पास देण्यात येत आहे. तर सर्वसामान्यांना मात्र कित्येक दिवस ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बहुतांश कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी कळंब शहरात राहतात. टाळेबंदी आणि जिल्हा बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयाकडून ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध आहे. कळंब शहराची हद्द बीड जिल्हयातील केज तालुक्याला लागून आहे. त्यामुळे शहरातुन केज तालुक्यातील नागरिकांना अत्यावश्यक तसेच शेतीच्या कामासाठी ये-जा करण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरून पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र पास देण्यात दुजाभाव केला जात असून आपत्ती विभागाचे संबधित टेबल प्रमुख आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कारण नसताना सुद्धा काही तासात परवानगी देत आहेत.तर शहरात वास्तव्यास पण केज तालुक्यात जमीन असलेल्या एका महिलेने ई-पास करीता १० जुलै रोजी मागणी करून ही अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची सर्रास पिळवणूक करण्यात येत असल्याचे उघड होत आहे.

जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज
कळंब शहरातील १० टक्के नागरिकांच्या जमिनी केज तालुक्यात आहेत. त्यामुळे त्यांना शेतीच्या कामासाठी मजूर घेऊन ये-जा करावी लागते.पास qकवा तहसीलदार यांचे पत्र असल्याशिवाय कळंब व केज हद्दीवर असलेले केजच्या चेकपोस्ट वरील पोलीस प्राशासनाकडून सोडले जात नाही. तहसील कार्यलयाकडून तात्काळ पास ही मिळत नाही त्यामुळे जिल्हाधिकाèयांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Read More  चेकपोस्टवरील पोलीस कर्मचा-यांचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सत्कार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या