24.4 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeउस्मानाबादजिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. तर रविवारी (दि.२५) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी १२ वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवानीची शनिवारी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते. शनिवारी श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यामध्ये पहाटे २ वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. व सकाळी ७ वा. ०५ मि. पूर्णाहुती करण्यात आली. नंतर कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहार मध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे अनंत कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते.

कोल्हापूर संस्थानच्या वतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला. यावेळी मंदिर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम नंदीबुवा, श्रीकृष्ण नंदीबुवा, श्रीराम नंदीबुवा, सुनील लसणे, भालचंद्र पाठक, बंडोपंत पाठक, सुमेध पाठक, शैलेश पाठक, महेश प्रयाग, मकरंद प्रयाग, प्रल्हाद पैठणकर, प्रसाद लसणे, अशोक ओवरीकर, शरद कांबळे, बाळासाहेब शामराज, संजय पाठक, रवी पाठक, नागेश शितोळे, श्री भोसले, हे उपस्थित होते. रविवारी (दि. २५) महानवमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी १२ वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या