29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या व मृत्यूने वाढवली चिंता

उस्मानाबाद जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या व मृत्यूने वाढवली चिंता

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या व वाढते मृत्यू प्रशासनासह नागरिकांची qचता वाढविणारी ठरु लागली आहे. गुरूवारी दि, ८ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात जिल्ह्यात ४८९ रुग्ण नव्याने आढळून आले असून एकूण ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळली तरच कोरोना उद्रेक कमी होणार आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासुन दररोज ४०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असतानाही शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक स्वयंशित्त पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असतानाही रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. शहरातील गर्दी पुर्वीसारखीच दिसून येत आहे. नागरिकांच्या गैरवर्तनापुढे आता प्रशासनही हतबल झालेले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात असले तरी नागरिक आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत.

दुकाने सुरू करावीत, या मागणीसाठी दुकानदार रस्त्यावर उतरू लागले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून विशेषतः उस्मानाबाद शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी ६० टक्केपेक्षा जास्त रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहरातील आढळून येत आहेत. जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहरातील आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उस्मानाबाद शहराच्या सर्व सिमा बंद करून शहरात येण्यास व बाहेर जाण्यास कडक प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही कोरोनाची साथ आटोक्यात येणे अशक्य आहे.

बुधवारी आलेल्या अहवालात ४८९ रुग्णांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील २५१, तुळजापूर ७१, उमरगा ४८, लोहारा ५, कळंब २९, वाशी १४, भूम १५, तर परंडा ५६ अशी रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात आजअखेर २३ हजार ५०२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ५८४ आहे. आजरोजी उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ हजार २९९ आहे. बुधवारी बरे झालेले रुग्ण २३१ आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

केळीच्या बागेत टोमॅटो व दोडक्याचे यशस्वी आंतरपीक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या