33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद श्री तुळजाभवानी दर्शनसाठीच्या फ्री पासेसमध्ये घोळ

श्री तुळजाभवानी दर्शनसाठीच्या फ्री पासेसमध्ये घोळ

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात गेल्या कांही दिवसापासुन अँक्सीस फ्री पासबाबत घोळ सुरु आहे. या पाश्र्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीरातील स्कॅनवर अँक्सीस पास चेक करताना ४० ते ५० अँक्सीस फ्री पास पकडण्यात आले आहेत. अँक्सीस पासबाबतीत घोळ घालून भाविकांची दिशाभुल करणा-यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असे मंदिर संस्थानचे अधिकारी तथा तहसिलदार सौदागर तांदळे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.१४) सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुढे बोलताना तहसिलदार तांदळे म्हणाले, श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक समाधान झाला पाहिजे. श्री देवीवर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. परंतु या तुळजाई नगरीत श्री देवीभक्त दर्शनासाठी आल्यावर कांही अज्ञात व्यक्तीकडून भाविकांची दिशाभुल करुन अँक्सीस फ्री पासचा काळाबाजार करुन आँनलाईन फ्री पास काढुन त्याची झेरॉक्स प्रत काढुन भाविकांना विक्री केला जात होता. या पाश्र्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदीरातील स्कॅनवर तो अँक्सीस पास चेक करताना ४० ते ५० अँक्सीस फ्री पास पकडण्यात आले आहेत. मंदीरात भाविकांच्या बाबतीत फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. यापुढे अँक्सीस पासबाबतीत घोळ घालून भाविकांची दिशाभुल केल्याचे दिसल्यास व बोगस पासची विक्री करणा-यावर तात्काळ गुन्हे दाखल करणार आहे.

भाविकांची दर्शनासाठी ओढ लक्षात घेता ६ हजारावरुन जवळजवळ ८ हजारपर्यत भाविकांना फ्री पासद्वारे सध्या सोडण्यात येत आहे. परंतु काही बनावट पुजारी वर्गाकडुन आपल्या स्वार्थापोटी विनाकारण भाविकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँक्सीस फ्री पास अगोदर काढून श्री देवी दर्शनासाठी घेऊन जाण्याचा कट रचला जात आहे. श्री तुळजाभवानी मंदीरातील कर्मचारी वर्गावर मोघम स्वरुपाचे आरोप करु नये, जर याबाबतीत दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. यापुढे अँक्सीस फ्री पासबाबतीत अधिकाअधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या अँक्सीस फ्री पासचे स्कॅनिंग योग्य प्रकारे केले जाणार आहे. बोगस फ्री पास काढणा-यावर प्रतिबंध करण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीची प्रतिष्ठा जपायची आहे.

श्री तुळजाभवानी मंदीरात पुजारी वर्गानी चांगल्या प्रकारे शिस्तप्रिय वागावे. जेणेकरुन भाविकांना याचा ञास होता कामा नये, श्री तुळजाभवानी मंदीरात श्री देवी भक्त दर्शन घेतल्यानंतर तो समाधान झाला पाहिजे हा हेतु आहे. त्यासाठी श्री देवी भक्तांना विनंती आहे की, आपणास श्री देवीचे दर्शन घेण्यासाठी दैनंदीन खुले करण्यात येत आहे. परंतु मंगळवार, शुक्रवार व रविवार रोजी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यासाठी भाविकांनी इतर दिवशीही दर्शनाचा लाभ घ्यावा. सध्या संसर्गजन्य कोरोनाचा पादुर्भाव जरी कमी झाला असला तरी मंदीरामधील धार्मिक विधी बाबतीत जिल्हाधिकारी तथा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावर राज्य शासनाच्या निर्णयानुसार निर्णय घेतील.

श्री तुळजाभवानी मातेवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. याठिकाणी भाविकांची मला सेवा करण्यासाठी संधी मिळाली. त्यामुळे दर्शनासाठी येणा-या भाविकांना कोणत्याही बाबतीत नाराजी होणार याची फार मी दक्षता घेत आहे असल्याचे तांदळे यांनी सांगितले. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले सहाय्यक जनसंपर्क आधिकारी नागेश शितोळे मंदीर संस्थानचे कर्मचारी जयqसग पाटील विश्वास परमेश्वर कदम इंजिनियर राजकुमार भोसले, विद्युत इंजिनियर अनिल बापुराव चव्हाण आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.

‘शक्ती’ विधेयक विधिमंडळात सादर, महिला व बालकांवरील अत्याचारासाठी फाशी, दहा लाखाच्या दंडाची शिक्षेची तरतूद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या