26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeउस्मानाबादकोरोनाने कलेला केले लॉकडाऊन.... शासनाचे ही दुर्लक्ष

कोरोनाने कलेला केले लॉकडाऊन…. शासनाचे ही दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

सकाळच्या रामाच्या पारी, मंजुळ आवाजातील बासरी ऐकायला कुणाला आवडणार नाही, पहाटेची गाणी, काकड आरती चा आवाज ऐकला की मन प्रसन्न होते. बासरीचे कसलेही शिक्षण नाही, बासरी कोठे मिळते हे ही माहित नाही, अक्षरांची ही ओळख नसताना, कळंब मधील मोल मजुरी करणारे रमेश कांबळे यांनी चाळीस च्या जवळपास वेगवेगळ्या बासèया तयार केल्या आहेत. स्वतः ला आनंद मिळवणयासाठी मी बासरी वाजवत असल्याचे सांगतात. या महा मारिने कलेला लॉक डाऊन करून, कलाकार यांच्या वर उपासमारीची वेळ आणली.

कळंब येथील रमेश कांबळे हे शेतामध्ये जनावरे राखत होते त्यावेळी त्यांना विविध पक्षांच्या आवाजाने मोहून टाकल. यात्रेमध्ये मिळणाèया बासरी ते जनावरे वळत असताना वाजवायचे व त्यातून त्यांना आनंद मिळायचा शेतातील झाडापासून त्यांनी मग वेगवेगळ्या बासèया बनवायला सुरुवात केली. लहान, मोठ्या मध्यम स्वरूपाच्या त्यांनी चाळीस च्या जवळपास बासèया बनवल्या असून, जेवण नको पण बासरी हवी एवढे त्यांचे बासरी वर प्रेम आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून ते मोलमजुरी करतात. सकाळी जेवणाच्या सुट्टीत व काम संपल्यानंतर ते बासरी वाजवण्याचा आनंद घेतात. त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही, पण प्रत्येकाला काही तरी छंद असतो, तो जोपासला पाहिजे असे ते म्हणतात. ज्यांचे कलेवर उपजीविका चालते, अशा कलाकारांना शासनाने मदत म्हणून दरमहा पाच हजार रुपये व विम्याचे कवच दिले पाहिजे.कारण संगीत व विविध कालच माणसाला जगण्यासाठी आनंद देतात व आज मात्र आनंद देणारे कलाकार घराबाहेर पडू शकत नाहीत व त्यांना कामधंदा ही मिळत नाही.

कलाकारांच्या कलेकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, शासनाने आशा कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ मिळ उन देऊन त्यांना मानधन देण्याची गरज आहे. रमेश कांबळे हे गुणी कलाकार आहेत. पहाटेच्या वेळी ते शहरातून फेरफटका मारताना, त्यांच्या मंजुळ बासरी वादणाने प्रत्येक जणांना भुरळ पाडली आहे. बासरी वादनात त्यांना आनंद मिळतो पण पोटासाठी कामच करावे लागते. त्यामुळे कलाकार जगला तर त्यांची कला जगेल असे त्यांना वाटते. या आठ महिन्याच्या काळात, अडचणीला सामोरे जावे लागले, पोटासाठी वाटेल ते काम केले. या महामारी पासून आम्हाला वाचव असे साकडे हे कलाकार देवी पुढे घालू लागले आहेत.

मुरूम येथे नुकसानीची खासदार,आमदारांकडून पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या