कळंब : कळंब शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे.शहरातील भारतीय स्टेट बॅंकेतील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मागच्या चार दिवसांपासून बॅंकेच बंद ठेवण्यात आल्याने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून ग्राहकांची कुचंबणा होत आहे. कोरोनामुळे चार दिवसांपासून बॅंक बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे हे कोणाच्या आदेश आहेत.असे संतप्त सवाल येथील व्यापारी,ग्राहकवर्गातून केले जात आहेत.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ची ग्राहक संख्या २० ते २२ हजार इतकी आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत.कोरोनामुळे सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत.कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू असताना मागच्या चार दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने नवीनच प्रश्न व्यपाऱ्याच्या पुढे उभे ठाकले आहेत.बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्स्फर करणे,पैसे ठेवणे काढणे,इतर बॅंकेला पैसे पुरविणे,शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे-मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत.बॅंक बंद असल्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे.
कर्मचारी कोरोनामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे.तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत.त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या गंभीर प्रकारची दखल घ्यावी अशी मागणी येथील व्यापारी संघटनेने केली आहे.
प्रा. बाळकृष्ण भवर
व्यापारी कळंब