लोहारा : सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक या ना त्या कामाने घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. लोहारा हे सासरवाडी असलेल्या ठिकाणी लातूर येथील जावई आपल्या पत्नीला भेटण्यासाठी येऊन गेला. या जावयाला लातुरात कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने लोहारा शहरात नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपंचायतने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ सासरवाडीतील घराजवळील ईदगा मोहल्ला परिसर सीलबंद केला आहे. नगरपंचायतकडून कोणीही नागरीक घराबाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन दवंडी देऊन केले आहे. जावई सासरवाडीत येऊन गेल्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून दोघा महिलांना होम कोरोटांईन तर तीन जणांना डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शहरातील प्रभाग १६ मध्ये आईवडिलांच्या घरी माहेरी आलेल्या पत्नीला लातूर येथील पती २४ जून रोजी भेटायला आला होता.
आपल्या पत्नीशी भेटून तो शहरातील प्रभाग १६ मधील सासरवाडीतच मुक्काम केला. आणि २५ जून रोजी प्रभागातील सतर्क नागरिकांनी परजिल्ह्यातून आपल्या पत्नीला भेटायला आलेल्या जावई बापूविषयी नगरपंचायत प्रशासनाला ही माहिती दिली होती. त्यानंतर तात्काळ नगरपंचायतमधील अधिकारी कर्मचा-यांनी त्या जावई बापुला संपर्क साधून त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालययात तपासणीसाठी पाठवले होते. यावेळी त्यांना थोडे फार ताप असल्याचे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले आणि क्वारटांईन होण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांनी नकार देत लातूरला आपल्या गावी गेले.
Read More औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजारांच्या पार
दरम्यान लातूर गेल्यानंतर त्याच दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय रुग्णालय गाठून तपासणी अंती शनिवार त्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. लातूर महानगरपालिकेच्या वतीने त्या रुग्णाला संपर्कात कोठे कोठे आले असल्याचे विचारपूस केल्यानंतर या जावयाने लोहारा येथे सासरवाडीत पत्नीला भेटायला गेलो होतो अशी माहिती दिली. त्यानंतर लातूर महानगरपालिकेने लोहारा नगरपंचायतला माहिती कळवली. यावेळी लोहारा नगरपंचायतमधील अधिका-यांनी जावई येऊन गेलेल्या सासरवाडीतील प्रभाग १६ मधील ईदगाह परिसर तात्काळ सिल केला आहे. तसेच घराच्या परिसरात नगरपंचायत कर्मचा-यांकडून फलक लावून नागरिकांना घराबाहेर न निघण्याची सूचना देण्यात आली असून कोरोना बाधित जावयाच्या संपर्कातील दोन महिलांना होमक्वारंटांईन तर तिघा जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात ठेवण्यात आले असल्याचे नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.
काटगावला कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण
तुळजापूर तालुक्यातील काटगावला कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी पवार, वैद्यकीय अधिकारी पुंडे आर.बी. व आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तलाठी अशोक भातभागे, ग्रामविकास अधिकारी भीमराव झाडे, इटकळचे आऊट पोस्ट पोलिस कॉन्स्टेबल सातपुते यांनी शनिवारी (दि. २७) गावाला भेट देऊन कंटेनमेंट झोन तयार करून परिस्थितीची पाहणी केली. रुग्णांच्या संपर्कातील २२ लोकांना टेस्टसाठी पाठविण्यात आले आहे. दक्षतेसाठी जनता कफ्र्यू लावण्यात आला असून काटगाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबरोबर अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दक्षतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल सातपुते, पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.