29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत शासकीय कार्यालयांना कोरोनाचा विळखा

उस्मानाबादेत शासकीय कार्यालयांना कोरोनाचा विळखा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून उस्मानाबाद शहर व तालुक्यात तर उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्ण हे उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. उस्मानाबाद शहरातील नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आदी शासकीय कार्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने ही कार्यालये सील करण्यात आली आहेत. शुक्रवारी दि. ८ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात ५६४ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा वाढत्या कोरोना रुग्णांने हॉटस्पॉट ठरु लागला आहे. दिवसागणिक १०० पेक्षापेक्षा जास्तीच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यात रुग्णसंख्या कमी असून सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहर व तालुक्यात आढळून येत आहेत. उस्मानाबाद शहरातील नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत यासह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यालये प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आली आहेत. कोणत्याही कामासाठी नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळली तरच कोरोना उद्रेक कमी होणार आहे. उस्मानाबाद शहरातील जवळपास प्रत्येक गल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावात रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय अधिकाèयांनी ही ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना येण्यास व जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासुन दररोज ४०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असतानाही शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक स्वयंशित्त पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असतानाही रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. शहरातील गर्दी पुर्वीसारखीच दिसून येत आहे. नागरिकांच्या गैरवर्तनापुढे आता प्रशासनही हतबल झालेले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात असले तरी नागरिक आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. दुकाने सुरू करावीत, या मागणीसाठी दुकानदार रस्त्यावर उतरू लागले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून विशेषतः उस्मानाबाद शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी ७० टक्केपेक्षा जास्त रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील आहे. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहरातील आढळून येत आहेत. जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद शहरातील आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उस्मानाबाद शहराच्या सर्व सिमा बंद करून शहरात येण्यास व बाहेर जाण्यास कडक प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही कोरोनाची साथ आटोक्यात येणे अशक्य आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात ५६४ रुग्णांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील ३५२, तुळजापूर ४०, उमरगा ४८, लोहारा १९, कळंब ५४, वाशी २३, भूम १५, तर परंडा १३ अशी रुग्णसंख्या आहे. शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर २४ हजार ६६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

खा. आमराजे निंबाळकर कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कुटुंबेच्या कुटुंबे विळख्यात अडकली आहेत. खा. ओमराजे निंबाळकर, त्यांच्या पत्नी संयोजनी राजेनिंबाळकर , स्विय सहाय्यक संतोष खोचरे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. निंबाळकर यांच्यावर बार्शी येथील जगदाळे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.तहसीलदार गणेश माळी हे पण पॉझिटिव्ह आहेत. शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचाèयांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या