36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeउस्मानाबादकोरोनाचा कहर सुुरूच, ५ हजाराचा आकडा ओलांडला

कोरोनाचा कहर सुुरूच, ५ हजाराचा आकडा ओलांडला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नागरिकांची कोरोनाची भिती कमी झाली असून काही अपवाद वगळता बहुतांश नागरीक बिनधास्त वागत असल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढच होत चालली आहे. जिल्ह्यात आजअखेर ५ हजार १०८ रुग्ण संख्या झाली असून उपचारानंतर ३ हजार ८३ बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण १३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात व तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ८९४ रुग्ण उपचार घेत आहेत.

गुरवारी १०० रुग्ण आढळून आले असून हे रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील २१, तुळजापूर १२, उमरगा २२, कळंब १७, परंडा ५, लोहारा १, भूम १६, वाशी १६ या प्रमाणे आहेत. रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, बालाजी नगर, श्रीकृष्ण नगर, बार्शीनाका, सांजारोड, जेल क्वांरंटाईन, आंबेडकर नगर, आनंद नगर, बी एन्ड सी क्वार्टर, भारत विद्यालयासमोर, श्रीकांत कॉलनी, बँक कॉलनी, वैराग नाका, जळकोट, इंजिनिअरिंग कॉलेज (तुळजापूर), तांबरी विभाग, वडगाव, अंबेहोळ येथील आहेत.

तुळजापूर तालुक्यात विश्वास नगर, अपqसगा, मंगरुळ, आरळी खुर्द, विठ्ठलनगर येथील आहेत. उमरगा तालुक्यात गुंजोटी, दाळींब, बालाजी नगर, कारळी, जुनी पेठ, कदेर, मुरुम, बँक कॉलनी, शेळके गल्ली मुरुम, जकेकुर, येकी, दाबका येथील आहेत. कळंब तालुक्यात कळंब पोलिस स्टेशन, पुनर्वसन सावरगाव, शिराढोण, qपपळगाव डोळा, निपाणी, देवळाली, ढोराळा, मोहारोड कळंब येथील आहेत. भूम तालुक्यात लक्ष्मी नगर, गांधी चौक, कसबा, बागडे गल्ली, बावी, हिवरा येथील आहेत. लोहारा तालुक्यात नागुर येथील आहे. परंडा तालुक्यात समर्थ नगर, शिक्षक सोसायटी, डोमगाव, पोलीस लाईन येथील आहेत. वाशी तालुक्यात कडकनाथवाडी, बावी येथील आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाèयांनी आदेश काढून तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टंqसग पाळणे बंधनकारक केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाèया व्यक्ती विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतू नागरिकांच्या वर्तनात बदल होताना दिसत नाही. शहरी भागात काही प्रमाणात आदेशाचे पालन केले जाते. परंतू ग्रामीण भागात तर आम्हाला काहीही होत नाही, म्हणून बहुतांश नागरीक तोंडाला मास्क बांधत नाहीत.

सोशल डिस्टंqसग पाळत नाहीत. मावा, सुपाèया, गुटखा खाऊन पचापच कोठेही थुकंतात. आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तींकडून प्रशासनाने आत्तापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आजही दररोज हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. नागरीक मात्र सुधारायच्या मानसिकतेत नाहीत. जिल्ह्यात कोरोना महामारीच्या कामात काम करणाèया यंत्रणा कंटाळल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तरच कोरोना आटोक्यात येणार नाही. जिल्ह्यात दररोज १०० ते २०० च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने उस्मानाबाद शहरातील खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत.

राज्य सरकारने परवानगी दिल्यास लोकल सुरू होईल : शलभ गोयल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या