16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeउस्मानाबादढोकी-तेरसह परिसरातील गावात कोरोनाचा कहर

ढोकी-तेरसह परिसरातील गावात कोरोनाचा कहर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक मोठे गाव असलेल्या तेर व परिसरातील गावात कोरोनाने थैमान घातले असून उपविभागीय अधिका-यांनी संबंधित गावाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. रुग्ण संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालल्याने व दररोज परिसरातील गावात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तेर गावात कोरोना रुग्णांची संख्या १०० पेक्षा जास्त झाली आहे. आजपर्यंत सहा महिन्याच्या काळात तेर गाव पाच वेळा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनेही जनता कफ्र्यु जाहीर केला जात असल्याने नागरिकांच्या मोकाट फिरण्यावर बंधने येत आहेत. परंतू गावात फिरणा-या नागरिकांकडून तोंडाला मास्क, सोशल डिस्टंqसगचे पालन केले जात नसल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. तेर जवळील वाणेवाडी, डकवाडी, कोळेवाडी, भंडारवाडी, आरणी, मोहतरवाडी, बुकनवाडी, कावळेवाडी, qहगळजवाडी, खेड, किणी गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासनाने संबंधित गावे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत.

आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाते. परंतू त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गावातील अन्य व्यक्तींची टेस्ट केली जात नसल्याने कोरोनाची साखळी तुटणे मुस्किल झाले आहे. याशिवाय कंटेनमेंट झोन फक्त नावालाच आहेत. नागरिकांच्या फिरण्यावर कोणी बंधने आणत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या घरातील व्यक्तींचे आरोग्य विभागाकडून तातडीने स्वॅब घेतले जातात. कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेरील अनेक व्यक्तींच्या संपर्कात आलेली असते. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वॅब qकवा रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट होत नाही. त्यामुळे संबंधित गावात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

यापुर्वी रुग्ण सापडलेल्या भागात ग्रामपंचायतकडून संपुर्ण भाग सील केला जात होता. आता फक्त त्या रुग्णाचे घर सील केले जात आहे. आरोग्य विभागाने एखाद्या गावात कोरोना रुग्ण सापडला तर त्या गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी गरजेचे आहे. परंतू रुग्णाच्या घरातील लोकांची तपासणी होत आहे. ढोकी, तेर परिसरातील दोन-चार गावे वगळता जवळपास सर्वच गावात कोरोनाचा कहर सुरू आहे. खाजगी दवाखान्यात कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण दाखल होत आहेत.

औसा तालुक्यात कोरोनाचे एक हजारापेक्षा अधिक रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या