Saturday, September 23, 2023

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; २७ जणांचा मृत्यू

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. रविवारी (दि. १९) पर्यंत जिल्ह्यातील ५०८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील १८ जुलै रोजी रात्री उशिरा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंतद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आलेल्या नमुन्यापैकी १५० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालामध्ये १२ जणांचे अहवाल हे पॉजिटीव्ह आले आहेत. तर १३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १२ पॉजिटीव्ह अहवालमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ९ जणांचा समावेश आहे.

त्यात उस्मानाबाद शहरातील गालीब नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, आगड गल्ली येथील ५२ वर्षीय पुरुष असून त्याचा मृत्यू झाला आहे. बार्शी नाका येथील २५ वर्षीय महिला, शाहु नगरमधील ३० वर्षीय महिला, धारासुर मर्दीनी मंदिराजवळील २५ वर्षीय पुरुष, सांजा चौकातील एस. टी. कॉलनीतील ३० वर्षीय पुरुष, तसेच आयुर्वेदीक महाविद्यालय येथील वसतिगृह येथील २४ वर्षीय पुरुष अशा ७ जणांचा उस्मानाबाद शहरातील व्यक्तींचा समावेश आहे. तर तालुक्यातील कौडगाव (बावी) येथील ३० वर्षीय पुरुष, पोहनेर येथील ५९ वर्षीय पुरुष अशा उस्मानाबाद तालुक्यातील ९ जणांचा समावेश आहे.

उमरगा तालुक्यातील एकजण असून तो उमरगा शहरातील हमीद नगर येथील ४० वर्षीय पुरुष आहे. तुळजापूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. त्यात जळकोट येथील ३० वर्षीय महिला, व तुळजापूर शहरातील एस. टी. कॉलनी येथील ४७ वर्षीय पुरुष आहे. त्यामळे रविवारपर्यंत १२ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. दिवसेंदिवस मृत्यूचा वाढत चाललेल्या आकडेवारीमध्ये नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून कोरोनाचा कहर वाढला आहे. मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना कायम आहे. त्यामुळे नागरिकांच्या भितीमध्ये वाढ होत चालली आहे. सुरवातीला जिल्ह्यात केवळ एक-दोन रुग्णाने वाढ होत होती. मात्र मागील महिन्यापासून तब्बल १५ ते २० रुग्णांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही आकडेवारी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ५०८ नागरिकांना लागण झाली आहे. त्यामुळे हा आकडा जिल्ह्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा सुरु झाली आहे. सुरवातीला जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी रुग्ण आढळून येत होते. परंतू सध्या ग्रामीण भागातही याचा फैलाव सुरु झाला आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणेकडून कोरोणाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आनखी लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. याबाबत काही जणांकडून मागणीही होत आहे. असाच आकडा वाढत चालला तर कोरोनाचा जिल्ह्यातील नागरिकांना धोका कायम आहे.

Read More  करोना झाल्याचे सांगितल्याने क्वारंटाईन रुग्णाने मित्राचे फोडले डोके

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या