उमरगा : उमरगा तालुक्यातील आरोग्य विभागात निव्वळ ढिसाळ कारभार सुरू आहे. जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाèयांचेच प्रशासनावर नियंत्रण नसल्याने त्यांच्या हाताखालील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभाराचा कित्ता गिरवत असून याचा नाहक त्रास मात्र कोविड रुग्णांना सहन करावा लागत आहे.
असेच एक उदाहरण तुगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-याकडून जाणीवपूर्वक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे या प्रकारावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाहीची प्रक्रिया करणार की प्रकरणावर चादर घालणार हे पहावे लागणार आहे.
उमरगा तालुक्यातील तुगाव येथील बिराजदार वस्ती मधील एका कुटुंबातील ११ सदस्य ४ सप्टेंबर कोरोनो पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांची मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील तिघांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयात आणि एकाला मुरूम येथील शासकीय वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आणि उर्वरीत सात रुग्णांना स्थानिक प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्याच परवानगीने नियम अटीचे पालन करत होम कॉरंटाईन करण्यात आले. त्यामुळे सात रुग्ण हे स्वतःच्या घरी राहून आरोग्याची काळजी घेत राहिले.
त्यानंतर मात्र कांही दिवसांनी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी वसतीमधील इतर सहा जणांचा अहवाल कोरोनो पॉझिटिव्ह आला. या सहा रुग्णांना देखील रितसर अर्ज भरून होम कॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर मात्र दि ९ रोजी या सर्व सहाही रुग्णांना मुरूम येथील शासकीय वसतीगृहातील कोविड सेंटर येथे जाण्यास सूचना देण्यात आले. आश्चर्य म्हणजे गावातील एका गल्ली पुढारीच्या सांगण्यानुसार वैद्यकीय अधिका-याने जाणीवपूर्वक ४ सप्टेंबर पासून होम कॉरंटाईन असलेल्या त्या सात रुग्णांना देखील कोविड सेंटरला पाठवले.
एकूणच या प्रकाराबद्दल रुग्णांची हेळसांड झाली असून मानसिक त्रास सहन करण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांवर ओढवली गेली आहे.दरम्यान पूर्वीच रितसर परवानगी देवून होम कॉरंटाईन सांगण्यास कोणी सांगितले? पाच दिवस घरात राहून रितसर काळजी घेत उपचार घेवून रोगातून मुक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णांना नव्या कोविड रुग्णासोबत पाठवणे योग्य आहे का? असे प्रकार घडत असताना तुगावच्या वैद्यकीय अधिका-याने तालुक्याच्या गटविकास अधिकारी qकवा आरोग्य अधिका-याला माहिती कळवली होती का? कोविड रुग्णांची हेळसांड केल्याप्रकरणी या अधिका-यावर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.
भाजपकडून कोरोना नियमांना हरताळ