26.4 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home उस्मानाबाद कोविडचे रुग्ण रुग्णालयातून पलायन,चिंता व चिंतन डाॅ. सिद्रामप्पा खजुरे

कोविडचे रुग्ण रुग्णालयातून पलायन,चिंता व चिंतन डाॅ. सिद्रामप्पा खजुरे

एकमत ऑनलाईन

कोविड – १९  या संसर्गजन्य रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नांची शिकस्त करीत असून हा रोग दिवसेंदिवस वाढतच आहे, डॉक्टर, नर्सेस, पोलीस ,अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या ,सफाई कामगार, हे सर्वजण जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत आज-काल देव मंदिरात आहे तो या सर्वाच्या रूपात ! ते रुग्णाची व समाजाची सेवा करीत आहेत तरीही मृत्युदर व रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही ही चिंतेची बाब असून यावर चिंतन होणे आवश्यक आहे, या रोगावर नियंत्रण करण्यासाठी प्रचलित पद्धत व यंत्रणा यामध्ये बदल करण्यासाठी नवनवीन तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे का ? यावरही विचार होणे आवश्यक आहे.

या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून काही आदेश, नियम घालून दिलेले आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे,समाजात त्याचे पालन होत नाही या समस्येकडे नागरिक गांभीर्याने  विचार करीत नाहीत व बेफिकीरपणाने वागण्याचे चित्र दिसत आहे, रोग पसण्यासाठी नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव हेही मुख्य  प्रमुख कारण आहे,कोविड – १९  आजाराने बाधित रुग्ण आजारापेक्षा मानसिक दृष्ट्या खचतो, घाबरतो, व या आजारावर कोणताही उपाय आज नाही हे माहीत झाल्यामुळे तो निराश होतो, बाधित रुग्णांचा संपर्क इतरांशी होऊ नये म्हणून उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागते, रुग्णालयातील वातावरण, अगोदर भरती झालेले रुग्ण तेथे मिळत असलेल्या सुविधा, मिळत असलेली वर्तणूक, एकटेपणाची खंत ,सामाजिक अंतर, इतर बंधनं यामुळे त्याच्या मनावर परिणाम होतो व अधिकाधिक निराश होतो.

असुरक्षिततेची जाणीव वाटायला लागते, रुग्णालयातील अस्वच्छता ,दूर अंतरावरून देण्यात येत असलेली आरोग्य सेवा,जेवण पाणी इत्यादींमुळे रुग्णाला अस्वस्थता वाटू लागते, या सर्व कारणांचा एकंदरीत परिणाम त्यांच्या रुग्णालयातील वास्तवावर होतो ,तेथे राहण्याची इच्छा कमी कमी होत जाते, शिवाय उपचार पद्धतीमध्ये काहीं गोळ्याचा समावेश असतो हे सामान्य व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या बाबतीत रुग्णालयात राहण्याचा काळ नसतो हेच दिसून येत आहे, मनावर एक प्रकारचे दडपण येते, भीती निर्माण होते व रुग्णालयातून बाहेर पडण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, बाहेर पडल्यानंतरच्या त्या परिस्थितीच्या गांभीर्याची तमा रुग्ण फारसा करताना दिसत नाही आणि रुग्ण पालन करतो ही बाब आज चिंताजनक आहे.

पलायन केलेल्या रुग्णांपासून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो ही वस्तुस्थिती आहे, रुग्णाच्या पलायनाच्या कारणा विषयी चिंतन करणे गरजेचे आहे, पलायन केलेल्या रुग्णाचा शोध घेऊन त्याला परत रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर रुग्णांमध्ये अपराधीपणाची भावना होते, व तो अधिकच खचतो ,रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, बेड, जेवणाची सुविधा, कर्मचारी यांची वागणूक, इतर सुविधा याकडे लक्ष असायलाच पाहिजे यात दुमत नाही पण त्यापेक्षाही रुग्णाची मानसिक स्थिती ,मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अणदूरच्या डॉक्टरने स्थानिक पातळीवर रुग्णाची चाचणी करण्याची ५० रॅपिड टेस्ट किट मागवल्या होत्या, बळेबळे २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली व उर्वरित किट परत कराव्या लागल्या, तपशीलात जाता असे लक्षात आले की पॉझिटिव्ह टेस्ट निघाल्यास आपल्याला १४ दिवस रुग्णालयात राहावे लागते त्यापेक्षा चाचणी न केलेली बरी अशा प्रकारच्या विचारांची नोंद रुग्णाच्या मनात आहे हे नाहीशी करणे विषयी चिंतन होणे फारच आवश्यक आहे, शासकीय यंत्रणा, खाजगी रूग्णालय, समाजसेवक , लोकप्रतिनिधी,या सर्वांनी मिळून या रोगाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी रुग्णांमध्ये असलेले बहिष्कृत भावना ,मानसिक आरोग्य, कोविड – १९ या रोगाचे गांभीर्य, तरुण वर्गातील बेफिकीरपणा या सर्व बाबीवर चिंतन होणे गरजेचे आहे ,समाजामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे हे शक्य आहे आपण सर्व मिळून या प्रवाहात काम करू या
डॉ सिद्रामप्पा खजुरे
खुदावाडी ता तुळजापूर

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे यांचे इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र

उमरगा : १ ऑक्टोबर जागतिक वृध्द दिन तसेच राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून १९९५ साली ज्येष्ठ समाजसेवक डॉ दामोदर पतंगे...

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

उस्मानाबाद : जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत...

जिल्ह्यात ३ लाख महिलांचे संघटन असलेले उमेद अभियान गुंडाळण्याच्या हालचाली

उस्मानाबाद : केंद्र व राज्य सरकार यांच्या अर्थसहाय्याने राज्यात २०११ पासून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून...

बेवारस, मनोरुग्ण, भटके आणि गोरगरिबांना ६५ दिवसांपासुन रोज अन्नदान

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी) : तुळजापूर शहरातील लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे हे मागील ६५ दिवसांपासुन शहरातील लोकसेवा फाऊंडेशन, लोकसहभाग व भोजनाच्या माध्यमातुन अनेक बेवारस,...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी उस्मानाबाद शहरातील आरोपी शंकर सुर्यभान जाधव (वय ५७ वर्ष) यास तदर्थ जिल्हा व सत्र...

३० सप्टेंबर रोजी भुकंपाला २७ वर्ष पूर्ण, काळ्या आठवणी मनामनात

लोहारा :(अब्बास शेख) ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे महाप्रलयंकारी भुकंपात मरण पावलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ लोहारा तालुक्यातील सास्तुर चौरस्ता येथे प्रतिवर्षी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात येते....

जिल्हाधिका-यांची दिव्यांगाप्रती माणुसकी

उस्मानाबाद : आपल्या कार्यालयात समस्या घेऊन भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नसल्याचे लक्षात आल्यावर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चक्क जमिनीवर बसून...

बावी येथे रुग्ण सेवा नव्हे; अनागोंदी कारभार

तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य उपकेंद्र बावी येथे असून या उपकेंद्राची अवस्था असून अडचन नसुन खोळंबा अशी झाली आहे....

जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी क्लाउड फिजिशियनची मात्रा

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज व तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातुन क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...