26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeउस्मानाबादपिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

एकमत ऑनलाईन

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अन्यथा कोवीड १९ मध्ये ज्या ज्या राजकीय नेत्यांनी आदेश झुगारून गर्दी केली. अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी (दि.२७) पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सास्तुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२६) लोहारा शहरात विविध मागण्यासाठी सकल समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चात सहभागी लोकांनी कोवीड-१९ चे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी बाळगली होती. सदर मोर्चा हा मूक मोर्चा होता. शांततेत लोहारा तहसील कार्यालयावर जाऊन मान्यवरांची मनोगते व्यक्त करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. असे असताना मोर्चात सहभागी झालेल्या उमाकांत लांडगे (लोहारा), रंजना हासुरे (हराळी), दगडू तिगाडे (लोहारा), गणेश सोनटक्के (जळकोट), प्रकाश घोडके (माकणी), तानाजी गायकवाड (लोहारा खुर्द), आशिष पाटील (वाशी), विष्णू वाघमारे (सास्तुर), तिम्मा माने (कास्ती खुर्द) यांच्यावर लोहारा पोलीस प्रशासनाने आकस बुद्धीने प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढार्यांना वगळून गुन्हे दाखल केले आहेत.

उर्वरित सहभागी लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान नुकसानीची पाहणी करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ठीकठिकाणी सभा घेतल्या. नागरिकांनी गर्दी केली होती. यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे आपण राज्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात भेदभाव न करता गर्दी जमा करणाèयावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा प्रशासनास सकल समाजाच्या रोशास सामोरे जावे लागेल. याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आशिष पाटील, उमाकांत लांडगे, दिपक रोडगे, तिम्मा माने, रोडगे नितीन आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

दोन आनंदाच्या बातम्या…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या