30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम

उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या. या कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही अत्यावश्यक सेवांबरोबर सूट देण्यात आलेल्या कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. आता अत्यावश्यक सेवा आणि सुट देण्यात आलेल्या बाबी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी (दि.१६) जारी केले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील आणि जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाने वाढणाèया रुग्णांची संख्या आणि जिल्हयात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडून नागरिक करत असलेली गर्दी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उस्मानाबादचे तहसीलदरा गणेश माळी,होम डी वाय एसपी एस.एस. बाबर आदी उपस्थित होते. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

या कालावधीत १४ एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांकरिता संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे व सूट देण्यात आलेल्या बाबींकरिता सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होणारी हालचाल वगळता कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. तथापि,असे निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिक अत्यावश्यक सेवांबरोबरच सूट देण्यात आलेल्या बाबींचे कारण सांगून मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.आणि गर्दी करत आहेत.त्यातून संचारबंदीचे उल्लंघन करित असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत दररोज सातत्याने वाढ होत आहे.

त्यातच नागरिकांकडून विनाकारण संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे कोव्हिड १९ या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तात्काळ अधिकच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व आणखी कडक निर्बंध लागू करणे अत्यावश्यक असल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी या आदेशात १६ एप्रिल ते १ मे सकाळी ७ पर्यंत कालावधीत अत्यावश्यक सेवांपैकी दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये, वाहतूक, पुरवठा साखळी. लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय साधनसामुग्री, त्यांची उपकरणे, कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक, सार्वजनिक वाहतूकीमध्ये रेल्वे, टॅक्सी, अटोरिक्षा व सार्वजनिक बसेस. मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, पेट्रोल पंप, यात उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप आणि जिल्ह्यातील सर्व पालिका हद्द जेथे संपते तेथून पुढे १० कि.मी. अंतराच्या पुढील भागात असणारे व केवळ राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावर असणारे पेट्रोल पंप पूर्ण वेळ सुरु राहतील.

या हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर १० कि.मी. अंतराचे आतील भागात असणारे सर्व पेट्रोल पंप सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच चालू राहतील. जिल्हा प्रशासनाने१४ एप्रिल रोजी दिलेल्या मूळ आदेशानुसार बंद असलेल्या सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी, उपक्रम, सेवा पूर्णवेळ बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाईस पात्र राहील. अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांकडून संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, या अनुषंगाने या आदेशाची व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,असेही या आदेशात जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे..

पंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या