24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादलोंबकळणा-या विद्युत तारामुळे नागरिकांना धोका

लोंबकळणा-या विद्युत तारामुळे नागरिकांना धोका

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गावातून जाणा-या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी विद्यतु तारा लोंबकळत असल्याने नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

हंगरगा (नळ) येथील गावात जाणा-या मुख्य रस्त्यावरील विजेच्या पोलच्या तारा खाली लोंबकळत आहेत. एखादा व्यक्ती जर सहज हातवर केल्यास तारेचा स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून दुचाकी-चारचाकी वाहनधारकांनाही याचा धोका होवू शकतो. गावातून आष्टा कासारकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर उघडी डीपी व तारा लोंबकळत असल्याने त्या तारांचा एकमेकांना घर्षण होवून qठगण्या पडत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जमीन औली झाल्याने जमीनीत अर्थिंग उतरुन नागरिकांना शॉकचे धक्के बसल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. याबाबत नागरिकांनी महावितरणच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना अनेकवेळा तक्रार देऊनसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Read More  मास्कविक्रीतून महिलांनी केली १२ लाखांची उलाढाल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या