28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादकुत्र्याने मटन खाल्ल्याच्या रागात बापाकडून मुलीचा गोळी झाडून खून

कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या रागात बापाकडून मुलीचा गोळी झाडून खून

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कुत्र्याने मटण खाल्ल्याने रागातून बापाने मुलीचा रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून खून केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली आहे. या प्रकरणी क्रुर आईसह बापावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात सोमवारी १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती-पत्नींनी दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावात कार्ला येथे त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे (वय २२) वर्षे हिला कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. वडील गणेश भोसले यांनी रागाच्या भरात मुलगी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून तीला गंभीर जखमी केले. यावेळी काजल हिचे नातेवाईक विशाल जयराम भोसले यांनी जखमी काजल हिला जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे उपचारासाठी घेवून जात असताना काजल हिचा मृत्यू झाला.

गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे, रा. कार्ला यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मनोज सुनिल शिंदे यांनी दि. १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३०२,५०४, ५०६, ३४ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गणेश भोसले व मिराबाई भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उपविभागाच्या पोलीस उप अधीक्षक सई भोरे-पाटील यांच्यासह नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या