33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद सोयाबीन बियाणांचा मोबदला मिळण्यासाठी दिरंगाई

सोयाबीन बियाणांचा मोबदला मिळण्यासाठी दिरंगाई

एकमत ऑनलाईन

उमरगा : खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने जवळपास एक हजार शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. शेतक-यांच्या तक्रारीमुळे कृषीमंत्री दादा भुसे शेतात येऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कृषि विभाग व समितीचे पंचनामे करून ९७८ शेतक-यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला. काही बियाणे कंपन्यांनी मोजक्या शेतक-यांना मोबदला दिला. मात्र बहुतांश शेतक-यांना बियाणे नुकसानीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही.

तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी अवर्षण तरी कधी अतिवृष्टीने खरीप पिकाचा हंगाम वाया गेलेला आहे. यंदाच्या खरिप पेरण्यासाठी वेळेवर व मुबलक
पाऊस झाला नव्हता. तरीही शेतक-यांनी पेरणीला गती दिली. सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र नेमके उलटे घडले आहे. महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले होते. तरीही मेहनत व आर्थिक पदरमोड करुन सोयाबीनचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. परंतू पुन्हा अतिवृष्टीने सोयाबीन पाण्यात गेले. शेतकरी आर्थिक संकटात असताना न उगवलेल्या बियाणांचा मोबादला देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतक-यांना मोबदला मिळाला नाही.

मोजक्याच शेतक-यांना मोबदल्याचा प्रत्यक्ष लाभ
तालुक्यात महाबीज, बसंत अ‍ॅग्रोटेक, बन्सल आणि ग्रीन गोल्ड, कृषिधन या कंपन्याच्या सोयाबीनच्या बियाणांची पेरणी शेतक-यांनी केली. न उगवलेल्या बियाणांच्या क्षेत्राची पाहणी करून पंचनामे झाले. समितीने ९७८ शेतक-यांच्या नुकसानीचा अहवाल दिला. त्यात महाबीजच्या ४५८ तक्रारी होत्या. काही कंपन्यांनी ब-याच शेतक-यांना मोबदला दिला. बियाणे बदलुनही दिले, परंतू संबंधित कंपन्याच्या विरूद्ध गुन्हे दाखल झाल्याने बराच गोंधळ उडाला. कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन एफआयआर दाखल करण्यावर स्थगिती मिळवली अशी माहिती सांगण्यात आली. परिणामी या सर्व प्रकारात बहुतांश शेतक-यांना मोबादला मिळणे थांबले.

महिला व बालकांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची ‘शक्ती’ विधेयकाला मंजुरी !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या