25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादराजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी देशमुख तर व्हा. चेअरमन सोनटक्के

राजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी देशमुख तर व्हा. चेअरमन सोनटक्के

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी राजर्षी शाहू ग्रामीण बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था अरंिवद नगर केशेगाव यांच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासह संचालक मंडळाची सोमवारी (दि.23) उस्मानाबाद येथील कोहिनूर हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी चेअरमनपदी पी.डी.देशमुख यांची तर व्हाईस चेअरमनपदी भारत सोनटक्के यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी फत्तेंिसह देशमुख, शाम देशमुख, शिवाजी ढोले, सतीश मुंगळे,शिवाजी केंडे, शिवाजी सुतार, ज्योती कदम, सत्वशीला गवळी, शलाका पाटील या सर्वांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरंिवद गोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट क्रे. सोसायटीचे चेअमन ऍड.चित्राव गोरे, आत्माराम आबदारे, महादेव बिडवे, यांच्यासह आंबेडकर परिवारातील आणि राजर्षी शाहू पतसंस्थेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या