लोहारा : शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता अभियानासाठी चौदाव्या वित्त आयोगातून शासन अमाप निधी ग्रामीण स्तरावरील संस्थेस देतो. परंतु याचा गैरवापर कशा पद्धतीने करायचा याचे उदाहरण लोहारा शहरात पहावयास मिळते. प्रशासानाकडून लाखो रुपये खर्चुन शहरातील मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुतारी व शौचालय गेल्या अनेक महिन्यापासून कुलूप बंद आहेत. याठिकाणी घाणीचे साम्राज्य व दुरावस्था पाहून अक्षरशः महिलांची कुचंबणा होत असल्याने तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील मुख्य चौकातील पुरुषासाठी मुतारी नव्याने डागडुगजी करून बांधण्यात आली आहे. ही मुतारी सध्यस्थितीत घाणीच्या विळख्यात असून साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. महिलांसाठी शौचालय व मुतारी नगरपंचायत विभागाकडून बांधण्यात आली आहे. परंतु ही मुतारी आणि शौचालय सतत बंद अवस्थेत असते. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये बील महिनाकाठी काढले जाते. मग याला पाठीशी कोण घालत आहे? घनकचरा व्यवस्थापन सुरळीत होत नसताना देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्षित का केले जाते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने नगर पंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याची तात्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा नागरिकांतून संतापाच्या लाटेत उग्ररूप धारण होईल, अशी चर्चा शहरामध्ये सुरु आहे.
शहरात बाहेरून विविध शासकीय कामासाठी महिलांची येण्याची संख्या अधिक आहे. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस थांबा असून वर्दळीचे ठिकाण आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी महिलांची लघुशंकेसाठी व प्रात विधीसाठी अडचण होत आहे. नगर पंचायतकडून ही सुविधा उभारण्यात आली परंतु आजघडीला तेथे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे महिलांना सुविधा मिळत नाही. शहरात चौकात महिला व पूरुषांसाठी मुतारी व्हावे अशी मागणी सातत्याने होत होती त्या अनुषंगाने पुरुषासह महिलांच्या सोई सुविधा साठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने मुतारी व सौचालय सुरू करण्यात आले परंतु ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापणा अभावी बंद अवस्थेत आहे. ज्या ठेकेदारामार्फत शहरातील स्वच्छता केली जाते अशा या नगरपंचायत च्या करार पत्रा नुसार मुतारी व सौचालय यादी मध्ये आहे कि नाही ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
नगरपंचायत विभागाने येथील शिवाजी चौकात महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सौचालय सुरू असल्याचे महिलांचे संग्रहित चित्र काढून महिलांसाठी सौचालय कडे जाण्याचा मार्ग दाखवले आहे परंतु संबंधित वरिष्ठांनीच सध्यस्थीतीत पंचनामा करावा अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वच्छतेबाबत अनेकवेळा संबंधितांना सांगितले. परंतु दखल घेतली नाही. स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जात असून मुतारी व शौचालय साफसफाईकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छता निरीक्षक नुसता नावालाच असल्याने चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
Read More लोहारा शहरात शौचालये घाणीच्या विळख्यात